जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पुणेकर सॉफ्टवेअर इंजिनिअर बनला शेतकरी, चक्क माती विना करतोय शेती!

पुणेकर सॉफ्टवेअर इंजिनिअर बनला शेतकरी, चक्क माती विना करतोय शेती!

पुण्यातील तरूण करतोय मातीविना शेती

पुण्यातील तरूण करतोय मातीविना शेती

तुम्ही कधी ‘मातीविना शेती’ अशी संकल्पना तुम्ही कधी ऐकली आहे का? चक्रावलात ना? पुण्यातल्या एका तरुणानं हे खरं करून दाखवलंय.

  • -MIN READ Pune,Maharashtra
  • Last Updated :

पुणे, 17 जुलै :  पारंपारिक शेती मागे पडून आता तंत्रज्ञानाच्या जोरावर शेतकरी शेती करू लागला आहे. आधुनिक शेतीचे असे अनेक नावीन्यपूर्ण प्रयोग तुम्ही आजपर्यंत ऐकले असतील. पण, तुम्ही कधी ‘मातीविना शेती’ अशी संकल्पना तुम्ही कधी ऐकली आहे का? चक्रावलात ना? पुण्यातल्या एका तरुणाने ही संकल्पना सत्यात उतरवून आपला शेतीमधला हा भन्नाट प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. पुण्यातील शैलेश मोडक याने ‘कंटेनर फार्मिंग’चा प्रयोग केला आहे. कृषी क्षेत्रामधील ही एक महत्त्वाचे क्रान्ती म्हणावी लागेल. त्याच्या या हटके प्रयोगाची सर्वत्र चर्चा होत आहे. शैलेश हा मूळचा नाशिकचा. पुण्यामध्ये कम्प्युटर सायन्समध्ये शिक्षण झाल्यानंतर त्याने सॉफ्टवेअर कंपनमध्ये कामाला सुरुवात केली. अनेक विदेशी कंपन्यांमध्ये त्याने काम केलं. परंतु नोकरी करत असताना काहीतरी वेगळं करायचंय ही त्याची जिद्द त्याला शांत बसू देत नव्हती. अखेर साडेतेरा वर्षांनंतर आयटी क्षेत्रातून राजीनामा देऊन त्याने नव्या आयडियाज शोधायला सुरुवात केली.

News18लोकमत
News18लोकमत

काय होता पहिला प्रयोग? शैलेशनं एकदा आकाशवाणीवर मधमाशांची माहिती देणारा कार्यक्रम ऐकला. त्यानंतर त्यांचं या विषयातलं कुतूहल जागं झालं. त्यांनी शेतीतज्ज्ञ डॉ. विकास खैरे यांच्याकडं मधमाशी पालनाचा कोर्स केला. त्यानंतर  ‘पुणेरी पॉलिनेशन सर्व्हिस’ हा पहिला व्यवसाय त्यानं सुरू केला.    शैलेशने मधमाशांच्या साठपेट्या घेऊन त्या शेतकऱ्यांना भाडेतत्वावर देण्यास सुरूवात केली. शेतकऱ्यांच्या समस्या सुटाव्यात, त्यांचे उत्पन्न वाढावे आणि एक खूप चांगले बिझनेस मॉडेल तयार व्हावे असा यामागचा उद्देश होता असे शैलेश सांगतो. एका पेटीमध्ये 10 ते 20,000 मधमाश्यांचा समावेश होता. हा व्यवसाय खूप आव्हानात्मक होता. त्यामध्ये बरेच शिकता आलं, असं शैलेशनं सांगितलं. मधमाशा का हल्ला करतात? असं घडलं तर करायचं काय? VIDEO कंटेनर शेतीची आयडिया शैलेशनं यानंतर मातीविना शेतीचा म्हणजेच कंटेनर फार्मिंगचा प्रयोग केला. या प्रयोगासाठी त्यानं डॉ. राहुल ढाके, डॉ. किरण भोंडे या मित्रांची मदत घेतली. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने रोपाच्या वाढीसाठी लागणाऱ्या म्हणजेच ‘सीडींग टू हार्वेस्टिंग’ अशा सर्व घटकांची व्यवस्था असलेला इन्सुलेटेड कंटेनर डिझाईन केला. कंटेनरमध्ये तापमान नियंत्रित करण्याकरता एअर सर्क्युलेटर, चिलर, एसी तसंच आद्रता कमी - जास्त करण्यासाठी आवश्यक अशा वेगवेगळ्या यंत्रणेचा वापर केला आहे. मोसंबीची शेती खरंच नफा देते का? कसं करायचं नियोजन? ‘थेरॉटिकल गोष्टी प्रॅक्टिकलमध्ये उतरवणं चॅलेंज होतं. सुरुवातीला एक-दोन पिके फेल गेली. त्यानंतर यश मिळालं. कंटेनरमध्ये आपण पालेभाज्यांसारखी इनडोअर पिकं  घेऊ शकतो.  स्ट्रॉबेरी पिकवण्याचा प्रयोगही यशस्वी झालाय. यामध्ये  4000 झाडे लावता येऊ शकतात. हायटेक फार्मिंगचा यूज करून बनवलेल्या या 320 स्क्वेअरफुटांच्या कंटेनरमध्ये एका वर्षात एक एकर पीक घेता येऊशकते,’  अशी माहिती शैलेशनं दिली.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात