कालूरामजाट, प्रतिनिधी दौसा, 14 जुलै : शेतकऱ्याला आपल्या पिकाबाबत खूप आशा असते. चांगले उत्पन्न मिळाले तर आपल्याला मेहनतीचे फळ मिळाले, असा आनंद शेतकऱ्याला होतो. अशाच एक शेतकरी आवळ्याची शेती करुन मालामाल झाला आहे. त्यांनी 4 एकरमध्ये आवळ्याची शेती केली आणि त्यांना लाखोंचा फायदा होत आहे. दौसा छारेड़ामध्ये एका शेतकऱ्याने कमी खर्चामध्ये चांगले उत्पन्न घेतले आहे. त्यांनी 4 एकरमध्ये 300 आवळ्याची बाग लावली. यामध्ये त्यांना जास्त खर्च नाही आला. पण उत्त्पन्न चांगले मिळत आहे. विनोद कुमार मीणा असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी सांगितले की, माझ्या 4 एकर शेतीमध्ये 300 आवळ्यांची बाग आहे. मला ही बाग लावून 20 वर्ष झाली. प्रत्येकवर्षी त्यांना चांगले उत्पन्न होत असल्याने बाजारात मोठ्या प्रमाणात विक्री होत आहे. या माध्यमातून त्यांना चांगला नफा मिलत आहे.
2005 मध्ये 1 वर्ष ही बाग तयार करण्यात गेले. यानंतर दुसऱ्या वर्षी मी 1 लाखांचा आवळा विकला. यानंतर आजपर्यंत प्रत्येक वर्षी चांगले उत्पन्न येत असून या आवळ्याची विक्री होत आहे. दरवर्षी 4 लाख रुपयांच्या आवळ्याची विक्री होत असल्याचे त्यांनी सांगितले. जेव्हा ही बाग लावली तेव्हा 1 लाख रुपये खर्च आला होता. त्यानंतर आजपर्यंत एक रुपयांही खर्च आला नाही. तसेच त्यांच्या या बागेसाठी काही खर्च केला. आज मला चांगला नफा होत आहे आणि प्रत्येक वर्षी 4 लाख रुपयांचे उत्पन्न विकतो. लोक याठिकाणांहून आवळे घेऊन जात असल्याचेही त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, आधी याठिकाणी गहू, बाजरा या पिकांची शेती केली जात होती. मात्र, पाणी जास्त लागायचे. तसेच फायदा जास्त होत नव्हता. त्यामुळे मी तणावात होतो. या दरम्यान, मला एका कृषी अधिकाऱ्याने आवळा लावण्याचा सल्ला दिला. तसेच तुम्हाला खर्च कमी येईल आणि या आवळ्याच्या शेतीतून तुम्ही लाखो रुपये कमावू शकता असे सांगितले. तसेच ही शेती कशी करावी, याबाबतही सांगितले, अशी आठवण या शेतकऱ्याने सांगितली.