मराठी बातम्या /बातम्या /मनी /आंबा लागवडीची श्रीलंकेतील बागायतदाराला भुरळ, संभाजीनगरची पद्धत करणार फॉलो

आंबा लागवडीची श्रीलंकेतील बागायतदाराला भुरळ, संभाजीनगरची पद्धत करणार फॉलो

श्रीलंकेतील आंबा उत्पादक व्यक्तीला महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने लागवड केल्या जाणाऱ्या आंबा लागवड व इतर तंत्रज्ञानाची भुरळ पडली आहे.

श्रीलंकेतील आंबा उत्पादक व्यक्तीला महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने लागवड केल्या जाणाऱ्या आंबा लागवड व इतर तंत्रज्ञानाची भुरळ पडली आहे.

श्रीलंकेतील आंबा उत्पादक व्यक्तीला महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने लागवड केल्या जाणाऱ्या आंबा लागवड व इतर तंत्रज्ञानाची भुरळ पडली आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Aurangabad, India

  सुशील राऊत, प्रतिनिधी

  छत्रपती संभाजीनगर, 3 मार्च : श्रीलंकेतील आंबा बागायतदार व निर्यातदार असलेल्या व्यक्तीला महाराष्ट्रातील आधुनिक पद्धतीने लागवड केल्या जाणाऱ्या आंबा लागवड व इतर तंत्रज्ञानाची भुरळ पडली आहे. ही लागवड पद्धत व तंत्रज्ञानाचा उपयोग आपल्या शेतात करण्यासाठी त्यांनी छत्रपती संभाजीनगर येथील आंबा फळबाग तज्ञ व गट शेती प्रणेते डॉ. भगवानराव कापसे यांची भेट घेतली. यावेळी त्यांच्याकडून आंबा शेती संदर्भात माहिती घेऊन तंत्रज्ञान समजाविण्यासाठी श्रीलंकेला येण्याचे निमंत्रण दिले आहे.

  श्रीलंकेतील हातडूवा इस्टेट रानवाला मिथ्रीगाला येथील असांका नानायक्कारा असे डॉ. भगवानराव कापसे यांची भेट घेणाऱ्या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांच्याकडे 700 एकरमध्ये आंबा लागवड केलीली आहे. त्यांच्याकडे आंबा बागेमध्ये टीजेसी वान त्यांनी लागवड केलेली आहे. या बागामध्ये महाराष्ट्रात आंब्याचे जेवढं उत्पन्न मिळत तेवढं मिळत नाही. यामुळे त्यांनी डॉ. भगवानराव कापसे यांना आपल्या फळबाग विषयी माहिती दिली व आंबा शेती संदर्भात माहिती घेतली.

  या भेटीदरम्यान असांका नानायक्कारा यांनी डॉ. कापसे यांना दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्याकडील आंबा बागेत टीजेसी वाण असून, दोन झाडांमधील अंतर तुलनेने अति जास्त आहे, बागेला ठिबक नाही, हॉट वॉटर ट्रीटमेंट केल्यानंतर फळावर ठिपके पडतात. शिवाय विमानानेच त्याची निर्यात केली जाते. महाराष्ट्रातील आंबा अतिघन लागवड तंत्रज्ञान प्रगत असून या तंत्रज्ञानाचा स्वीकार आपण आपल्या व इतर शेतकऱ्यांच्या बागेत करण्यासाठी उत्सुक असल्याचे स्पष्ट केले. या तंत्रज्ञानाच्या आधारे आणखी 500 एकरवर आपण आंबा लागवड करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. यावेळी त्यांनी मार्चमध्ये डॉ. कापसे यांना श्रीलंकेला येऊन तंत्रज्ञान अवगत करण्यासाठी येण्याचे निमंत्रण दिले.

  'ती' युक्ती ठरली सरस, नाशिकचा तरुण दूध उत्पादनातून करतोय लाखोंची कमाई, Video

  श्रीलंकन शेतकरी असांका नानायक्कारा यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये येऊन माझी भेट घेतली. यावेळी त्यांनी त्यांच्या शेतामध्ये लावलेल्या आंबा बागे संदर्भात माहिती दिली. यावरती मी त्यांना त्यांच्याकडे असलेल्या त्रुटी त्यांच्या लक्षात आणून दिल्या. त्यांना 500 एकरवर शेतीमध्ये आंबा लागवड करायची आहे. त्यासाठी श्रीलंकेला येण्याचे निमंत्रण त्यांनी दिले आहे. यामुळे मी त्यांना श्रीलंकेमध्ये आंबा कसा पिकवावा आदींविषयी आपल्याकडील  तंत्रज्ञान समजावून सांगणार आहे, असं  डॉ. भगवानराव कापसे यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Agriculture, Aurangabad, Farmer, Local18