छत्रपती संभाजीनगर,19 जुलै: सध्याच्या काळात अनेक शेतकऱ्यांचा आधुनिक शेतीकडे कल वाढत आहे. त्यासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञानाची गरज असते. शेतीत लावणीसाठी शेतकऱ्यांना मोठा खर्च येतो. त्यात मजूर मिळत नसल्याने अडचणी येतात. यावर छत्रपती संभाजीनगरमधील देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी एक चांगला उपाय शोधून काढला आहे. टीम भूमितपूत्रने ट्रॅक्टरच्या सहाय्यानं चालणारं एक यंत्र तयार केलं असून याद्वारे एका तासात 7 हजार 200 रोपांचे रोपण करणार आहे. शेतकरी पुत्रांची मोठी कामगिरी देवगिरी अभियांत्रिकी महाविद्यालयात शिकणारे बहुतांश विद्यार्थी हे शेतकरी कुटुंबातील आहे. शेतकऱ्यांच्या दैनंदिन जीवनातील समस्यांची त्यांना जाण आहे. शेतकऱ्यांना लागवडीच्या काळात वेळेवर मजूर मिळत नाही. त्यामुळे अनेक अडचणींना सामोरं जावं लागतं. यासाठीच या शेतकरी पुत्रांनी अत्याधुनिक स्वयंचलित लावणी यंत्र बनवण्याचा निर्णय घेतला. त्याला महाविद्यालयाचे प्राचार्य आणि शिक्षकांनी पाठिंबा देत सहकार्य केले. त्यामुळे ऑटोमॅटिक मल्टी व्हेजिटेबल ट्रान्स प्लांटर यंत्र तयार झाले.
कसं आहे लावणी यंत्र? विद्यार्थ्यांनी तयार केलेले लावणी यंत्र स्वयंचलित आहे. या यंत्रामध्ये विद्यार्थ्यांनी यंत्राच्या फ्रेमसाठी लोखंडी स्क्वेअर अँगल पाईप, ट्रे ठेवण्यासाठी कॉन्व्हेंटर, दोन रोबोटिक आर्म ॲम्बुलन्स बनवलेले आहेत. तर ऊर्जेसाठी बॅटरी लावलेली आहे. हे यंत्र कोणत्याही प्रकारच्या ट्रॅक्टरला जोडता येऊ शकते. त्यामुळे भाजीपाला पिकांची लावणी करण्यासाठी अगदी सुलभता येणार आहे. एका तासात 7 हजार 200 रोपांचे रोपण हे यंत्र करू शकते, असं विद्यार्थ्यांनी सांगितले. शेतकऱ्यांना लवकरच उपलब्ध ऑटोमॅटिक मल्टी व्हेजिटेबल ट्रान्स प्लांटर यंत्र तयार करण्यासाठी जवळपास 60 हजार रुपयांचा खर्च आला. तर तीन महिन्यांत हे यंत्र बनवून तयार झाले. लवकरच काही सुधारणा करून याचे पेटेंट मिळवणार आहोत. त्यानंतर वर्षभरात हे यंत्र शेतकऱ्यांना उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न असणार आहे. त्यासाठी दर अत्यंत कमी ठेवण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे, असेही विद्यार्थ्यांनी सांगितले. 70 ते 80 टक्के विजेची होणार बचत, विद्यार्थिनींनी मिळून तयार केला खास प्रोजेक्ट,Video शेतकरी पुत्रांचा अभिमान विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगले यंत्र तयार केलेला आहे. सर्व विद्यार्थी शेतकरी कुटुंबातील असल्यामुळे त्यांना या परिस्थितीची जाण होती. एक शिक्षक म्हणून मला विद्यार्थ्यांचा खूप खूप अभिमान आहे, असे महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. उल्हास शिऊरकर म्हणाले. तर विद्यार्थ्यांनी अत्यंत चांगला प्रोजेक्ट तयार केलेला आहे. यासाठी आमच्या महाविद्यालयातील सर्व शिक्षकांनी प्राचार्यांनी आम्हाला खूप सहकार्य केलं, असं मार्गदर्शक डॉ. सचिन अग्रवाल यांनी सांगितलं.