जाहिरात
मराठी बातम्या / मनी / बारामतीत शेतकऱ्याने केली 'या' फळाची लागवड, एक झाड देतंय वर्षाला इतक्या हजारांचं उत्पन्न

बारामतीत शेतकऱ्याने केली 'या' फळाची लागवड, एक झाड देतंय वर्षाला इतक्या हजारांचं उत्पन्न

प्रतिकात्मक फोटो

प्रतिकात्मक फोटो

पारंपरिक शेतीशिवाय काही नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने या शेतकऱ्याने तज्ज्ञांकडून माहिती घेतली.

  • -MIN READ Trending Desk Baramati,Pune,Maharashtra
  • Last Updated :

    मुंबई, 1 जुलै : शेतीमध्ये नवनवीन प्रयोग करून चांगलं उत्पन्न घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल वाढत आहे. अनेक शेतकऱ्यांचे प्रयोग यशस्वी झाले असून, ते आता लाखो रुपयांची कमाई करत आहेत. महाराष्ट्रामधील बारामतीत सध्या खजुराच्या शेतीची खूप चर्चा आहे. वाळवंटी प्रदेशात पिकणाऱ्या खजुराची यशस्वी शेती एका शेतकऱ्याने केली आहे. प्रशांत काटे नावाचा हा शेतकरी एका झाडापासून वर्षाकाठी 50 हजार रुपये कमवत आहे. या संदर्भात’नवभारत टाइम्स’ने वृत्त दिलं आहे. खजुरशेतीसाठी खर्च खूप कमी आहे. प्रशांत यांनी बारामती तालुक्यातील मालेगाव खुर्दमध्ये हा प्रयोग केला आहे. त्यांची यशोगाथा पाहून इतर शेतकरीही खजूर लागवड करण्याच्या विचारात आहेत. प्रशांत काटे यांना खजूर लागवडीची कल्पना कशी सुचली आणि आता त्यांना किती नफा होतोय,याबद्दल आपण सविस्तर जाणून घेऊ या.

    News18लोकमत
    News18लोकमत

    अभ्यासानंतर केली शेती -  पारंपरिक शेतीशिवाय काही नवीन प्रयोग करण्याच्या उद्देशाने प्रशांत काटे यांनी तज्ज्ञांकडून माहिती घेतली. तेव्हा त्यांना गुजरात राज्यातील वलसाड येथून खजूर लागवडीची माहिती मिळाली. यानंतर काटे यांनी खजूर लागवडीसाठी लागणारे वातावरण आणि त्यासाठी लागणारा खर्च जाणून घेतला आणि खजुराची झाडं लावली. 2017मध्ये झाडं लावली,पाच वर्षांनी आली फळं -  काटे यांनी गुजरातमधून प्रति रोप3,500रुपये दराने122रोपं आणली आणि2एकर क्षेत्रात25 x 25अंतरावर लागवड केली. लागवडीनंतर पाच वर्षांनी झाडाला फळं येतात. या झाडांना सुमारे80ते100वर्षे फळं येतात. सुरुवातीला प्रति झाड25ते30किलो फळं येतात. हळूहळू ते प्रमाण100ते150किलोपर्यंत पोहोचतं. मुंबई,हैदराबादमध्ये विक्री -  काटेंनी2017मध्ये खजुराची लागवड केली होती. सध्या त्यांना प्रति झाड60ते70किलो खजूर मिळत आहे. हे खजूर100ते200रुपये किलोने विकले जात आहेत. बारामतीमध्ये पिकवलेल्या खजुरांना पुणे,मुंबई,रत्नागिरी,हैदराबाद,बेंगळुरू इत्यादी बाजारपेठांमधून मागणी आहे. खजूर शेती करण्याचं आवाहन -  खडकाळ जमिनीत पिकं उगवत नाहीत तिथे नवीन काहीतरी करण्यासाठी खजुराची लागवड करण्याचा प्रयोग करण्याचे ठरले. तो प्रयोग यशस्वी झाला. कमी खर्चात जास्त उत्पादन होत आहे. ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी ओल्या व खडकाळ आहेत,त्यांनी खजूर लागवड करून उत्पादन घ्यावं,असं आवाहन प्रशांत काटे यांनी केलंय.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    Tags: farmer , Pune , tree
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात