जाहिरात
मराठी बातम्या / मनी / Agriculture News : फक्त एका झाडापासून मिळणार 25 हजारांपर्यंत उत्पन्न, असं कोणतं आहे हे फळ?

Agriculture News : फक्त एका झाडापासून मिळणार 25 हजारांपर्यंत उत्पन्न, असं कोणतं आहे हे फळ?

Agriculture News : फक्त एका झाडापासून मिळणार 25 हजारांपर्यंत उत्पन्न, असं कोणतं आहे हे फळ?

अक्रोड हे फळ शेतकऱ्याला चांगला नफा मिळवून देऊ शकते. आरोग्यासाठी उपयुक्त घटक तसेच यामध्ये आढळणारे औषधीय घटकांमुळे आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत या फळाला चांगलीच मागणी असते.

  • -MIN READ Ahmadnagar,Ahmadnagar,Maharashtra
  • Last Updated :

अहमदनगर, 8 जुलै: अक्रोड हे एक फळ पीक आहे. यामध्ये असणाऱ्या अनेक गुणधर्मांमुळे बाजारपेठेत अक्रोडच्या मागणीत सातत्याने वाढ होत आहे. अक्रोडात शरीराला आवश्यक असणारे पोषक घटक असल्यामुळे ते आरोग्यासाठी खूप फायदेशीर असते. त्यामुळे बाजारपेठेत आक्रोडचा बाजारभाव नेहमीच वधारलेला असतो. यामध्ये आढळणाऱ्या पोषक घटकांमध्ये कॅलरीज, कर्बोदके, प्रथिने, फायबर इ.पोषक तत्वे असतात. या अशा अनेक गुणधर्मामुळे अक्रोडला ‘जीवनाचे झाड’ देखील म्हटलं जातं. कुठं होते अक्रोडची शेती? अक्रोडाची लागवड प्रामुख्याने डोंगराळ भागात केली जाते. अक्रोड हे प्रामुख्याने उत्तर-पश्चिम हिमालयातील फळ आहे आणि त्याची झाडे समुद्रसपाटीपासून 1200 ते 2150 मीटर उंचीवर वाढतात. सध्या अक्रोडाची लागवड जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश, उत्तरांचल आणि अरुणाचल प्रदेशात केली जाते. अक्रोडाचे मोठे उत्पादन प्रामुख्याने जम्मू आणि काश्मीरमध्ये केले जाते. अक्रोडाचे वनस्पती नाव जुगलन्स निग्रा आहे. आता भारतातील अनेक राज्यांमध्ये त्याची लागवड सुरू झाली आहे. योग्य पध्दतीने व सुधारित वाणांची निवड करून त्याची लागवड केल्यास शेतकऱ्यांना लाखो रुपयांचे उत्पन्न मिळू शकते, असे अहमदनगर येथील कृषी अभ्यासक सचिन वाघ सांगतात.

News18लोकमत
News18लोकमत

एका झाडापासून 25 हजारांचे उत्पन्न अक्रोडाची लागवड ही फळबागांच्या श्रेणीत ठेवण्यात आली असून, ती शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढविण्यास अत्यंत उपयुक्त ठरते. भारतीय बाजारपेठेत तसेच आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत (International markets) अक्रोडाची मागणी खूप मोठी आहे. आक्रोडच्या झाडापासून उत्पादन सुरू होण्यासाठी साधारण 8 ते 10 वर्षांचा कालावधी लागतो, या कालावधीनंतर आक्रोडच्या एका झाडापासून साधारण दहा किलो पेक्षा अधिक काजूचे उत्पादन मिळू शकते. बाजारपेठेत असणाऱ्या उपलब्ध बाजारभावानुसार आक्रोडचे एक झाड उत्पादकाला साधारण 25 हजारांपर्यंत उत्पादन देऊ शकते, असे कृषी अभ्यासक वाघ सांगतात. अक्रोडचं आयुर्वेदिक महत्त्व आपल्या देशात मिठाई बनवण्यापासून ते औषधी बनवण्यापर्यंत त्याचा वापर केला जातो. अक्रोडाला आयुर्वेदात खूप महत्त्व दिले गेले आहे. त्यात अँटिऑक्सिडंट्स, फायबर, कॅलरीज, प्रोटीन्स, कार्बोहायड्रेट्स यांसारखे पोषक घटक असतात. त्यामुळे शरीराची रोगप्रतिकारक शक्ती वाढते. त्यामुळे शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थितीत सुधारणा करण्यासाठी आक्रोड उत्तम पर्याय आहे, अस कृषी अभ्यासक सांगतात. Ahmednagar News: नगरचा ‘मिलेट मॅन’, घरी सुरू केली ‘भरड धान्याची बँक’! सरकार करते मदत राष्ट्रीय फलोत्पादन अभियानांतर्गत फळे आणि भाजीपाला लागवडीसाठी सरकार शेतकऱ्यांना आर्थिक मदत करते. सध्या शेतकरी बागायती पिकांची लागवड करून चांगला नफा कमावत आहेत. भारतातील अनेक भागांत फळबागांच्या पिकांतर्गत ते डायफ्रुट्सची लागवड करून चांगला नफाही मिळवत आहेत.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात