मराठी बातम्या /बातम्या /मनी /Share Market : आठवडाभराच्या तेजीनंतर शेअर बाजारात पडझड; उद्याचा दिवस कसा असेल?

Share Market : आठवडाभराच्या तेजीनंतर शेअर बाजारात पडझड; उद्याचा दिवस कसा असेल?

आज सेन्सेक्स 49.54 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी खाली 61,716.05 वर बंद झाला. तर निफ्टी 58.30 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी खाली 18,418.75 स्तरावर बंद झाला.

आज सेन्सेक्स 49.54 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी खाली 61,716.05 वर बंद झाला. तर निफ्टी 58.30 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी खाली 18,418.75 स्तरावर बंद झाला.

आज सेन्सेक्स 49.54 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी खाली 61,716.05 वर बंद झाला. तर निफ्टी 58.30 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी खाली 18,418.75 स्तरावर बंद झाला.

मुंबई, 19 ऑक्टोबर : शेअर बाजारात (Share Market) आज बरीच चढउतार पाहायला मिळाले. मार्केट ओपन झालं त्यावेळी मोठी रॅली पाहायला मिळाली. सेन्सेक्स (Sensex) पहिल्यांदा 62000 स्तरावर पोहोचला तर निफ्टी (Nifty) देखील 18600 स्तरावर पोहोचली होती. बँक निफ्टी (Bank Nifty) देखील तेजीत दिसत होती. बँक निफ्टी देखील 40000 पर्यंतच्या रेंजवर गेली होती. मात्र त्यांना प्रॉफिट बुकिंगमुळे बाजारात घसरण पाहायला मिळाली. सर्वात जास्त प्रॉफिट बुकिंग मिड आणि स्मॉल कॅपमध्ये आली. यादरम्यान रियल्टी, FMCG आणि मेटल इंडेक्सवर मोठी पडझट पाहायला मिळाली. ऑटो, फार्मा, बँकिंग शेअरमध्येही घसरण झाली.

मात्र याउलट IT शेअर्समध्ये तेजी पाहायला मिळाली आणि IT इंडेक्स तीन आठवड्यांच्या वरच्या स्तरावर बंद झाला. बाजार बंद झाला त्यावेळी सेन्सेक्स 49.54 अंकांनी म्हणजेच 0.08 टक्क्यांनी खाली 61,716.05 वर बंद झाला. तर निफ्टी 58.30 अंकांनी म्हणजे 0.32 टक्क्यांनी खाली 18,418.75 स्तरावर बंद झाला.

LKP Securities चे एस रंगनाथन यांनी सांगितलं की, आज बाजारात मोठी प्रॉफिट बुकिंग (Profit Booking) झाली. मात्र, आयटी इंडेक्स आज मजबूत दिसला. FMCG मध्ये विक्रीबरोबरच बाजारात पडणाऱ्या शेअर्सची संख्या वाढणाऱ्या शेअरपेक्षा जास्त होती. आजपर्यंत अनेक टॉप परफॉर्मिंग मिडकॅप शेअर्लमध्ये विक्री दिसून आली. आज बीएसई मिडकॅप आणि स्मॉलकॅपमध्ये सुमारे 1 टक्क्यांची घट दिसून आली आहे.

कागद नाही तर या पदार्थापासून तयार होतात नोटा; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

 शेअर बाजारात उद्याचा दिवस कसा असेल?

चॉईस ब्रोकिंगचे (Choice Broking) सचिन गुप्ता म्हणतात की, टेक्निकल फ्रंटवर निफ्टीने ट्रेंडच्या टॉपवर एक लॉग बियरिश कँडल तयार केली आहे जी काउंटरमध्ये आणखी रिव्हर्सल होण्याचे संकेत आहे. मात्र निफ्टीला रोजच्या चार्टवर अप्पर बोलिंगर बँडच्या फॉर्मेशनवर सपोर्ट मिळताना दर्शवत आहे. निफ्टीसाठी 18,200 पातळीवर इमिडिएट सपोर्ट दिसत आहे. तर 18,600 वर रजिस्टंन्स दिसत आहे.

Tata चा 'पॉवर'फुल शेअर! गुंतवणूकदारांची 15 दिवस आधीच दिवाळी

 हेम सिक्युरिटीजचे मोहित निगम म्हणतात की सात दिवसांच्या सतत वाढीनंतर आज निफ्टीत आज प्रॉफिट बुकिंग झाले. बाजारातील आजची घसरण खरेदीची चांगली संधी असेल. निफ्टीसाठी 18,300 वर सपोर्ट दिसून येत आहे.

इक्विटी 99 चे राहुल शर्मा म्हणतात की गुंतवणूकदारांनी आता फक्त स्टॉपलॉस लावून सावधगिरी बाळगली पाहिजे. निफ्टीसाठी 18350 वर इमिडिएट सपोर्ट दिसत आहे. जर ही रेंज ब्रेक केली तर निफ्टी आणखी कमकुवत दिसून येईल. मग निफ्टीसाठी पुढील सपोर्ट 18,250 आणि 18,200 असेल. वरच्या बाजूस, निफ्टीसाठी 18,550 वर रजिस्टन्स दिसून येत आहे. 18,600 च्या वर जाणून घेण्यासाठी निफ्टीला ही लेव्हल ब्रेक करावी लागेल.

First published:
top videos

    Tags: Sensex, Share market, Stock Markets