Home /News /money /

ADIA-Reliance Retail Deal: अबूधाबीच्या फंडची RIL रिटेलमध्ये साडेपाच कोटींची गुंतवणूक

ADIA-Reliance Retail Deal: अबूधाबीच्या फंडची RIL रिटेलमध्ये साडेपाच कोटींची गुंतवणूक

अबूधाबीची मोठा सोव्हरिन फंड असलेल्या Abu Dhabi Investment Authority (ADIA) ही कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) मोठी गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे.

    मुंबई, 6 ऑक्टोबर :  अबूधाबीची मोठा सोव्हरिन फंड असलेल्या Abu Dhabi Investment Authority (ADIA) ही कंपनी रिलायन्स रिटेलमध्ये (Reliance Retail) मोठी गुंतवणूक करणार असल्याचं जाहीर केलं आहे. गेल्या काही महिन्यांमध्ये रिलायन्सच्या (RIL) रिटेल उद्योगात अनेक मोठ्या आंतरराष्ट्रीय कंपन्या गुंतवणूक करत आहेत. त्यात ADIA च्या 5,512.5 कोटी रुपयांच्या नव्या गुंतवणुकीने आणखी भर पडली आहे. अबूधाबीच्या या मोठ्या फंडने गुंतवणूक केल्यानंतर ADIA कडे रिलायन्स रिटेलची 1.2 टक्के भागीदारी येईल, अशी माहिती रियायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने (RIL)प्रसिद्ध केलेल्या निवेदनात दिली आहे. या गुंतवणुकीमुळे RRVL च्या समभाग मूल्यात (equity ) वाढ होऊन ते 4.285 लाख कोटी इतकं होणार आहे. रिलायन्स रिटेल उद्योगात आणत असलेल्या बदलांना या नव्या गुंतवणुकीमुळे चालना मिळणार आहे, असं RIL ने म्हटलं आहे. रिलायन्स रिटेलने यापूर्वीही अनेक जागतिक गुंतवणुकदारांना आपल्याकडे खेचलं आहे. सिल्व्हर लेक, KKR, जनरल अटलांटिक, मुबादला, GIC, TPG आणि आता ADIA यांच्या सहभागामुळे रिलायन्स रिटेलने 37,710 कोटी रुपयांची गुंतवणूक उभी केली आहे. ADIA च्या नव्या गुंतवणुकीबद्दल रिलायन्सचे चेअरमन आणि व्यवस्थापकीय संचालक मुकेश अंबानी म्हणाले, "चार दशकांच्या ADIA च्या ट्रॅक रेकॉर्डचा आणि विश्वासार्हतेचा आम्हाला फायदा होईल. ADIA च्या ताज्या गुंतवणुकीबद्दल जाहीर करताना आम्हाला अत्यंत आनंद होत आहे." अबूधाबीच्या ADIA प्रायव्हेट इक्विटी विभागाचे संचालक हमद शाहवान अलधहेरी म्हणाले, "आशिया आणि त्याच्याशी निगडीत बाजारपेठेत प्रचंड वाढ होत आहे. या वाढणाऱ्या आणि तंत्रज्ञानाच्या वाढत्या वापरामुळे बहुआयामी झालेल्या बाजारपेठेत गुंतवणूक करण्याच्या आमच्या स्ट्रॅटेजीनुसारच RIL रिटेलमध्ये आम्ही ताजी गुंतवणूक केली आहे. "
    Published by:अरुंधती रानडे जोशी
    First published:

    Tags: Reliance, RIL

    पुढील बातम्या