मराठी बातम्या /बातम्या /मनी /

पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर! दोन लाखांचा फायदा होणार, कसा?

पंजाब नॅशनल बँकेत खाते असणाऱ्यांसाठी खुशखबर! दोन लाखांचा फायदा होणार, कसा?

पंजाब नॅशनल बँक (Punjab National Bank) आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. जन धन खात्यांच्या खातेधारकांना (Jan Dhan Accounts) बँक ही सुविधा पुरवत आहे.

  • Published by:  Pravin Wakchoure

मुंबई, 19 ऑक्टोबर : एखादी गोष्ट फ्रीमध्ये मिळत असेल तर ती कुणाला नको असते, सर्वांनाच ती हवीहवीशी वाटते. अशीच एक फ्री सुविधा आता पंजाब नॅशनल बँकेच्या (Punjab National Bank) खातेधारकांना मिळणार आहे. पीएनबी आपल्या ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत मोफत विमा देत आहे. जन धन खात्यांच्या खातेधारकांना (Jan Dhan Accounts) बँक ही सुविधा पुरवत आहे. याशिवाय, ग्राहक बँकेच्या आणखी अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात. काय आहे नेमकी ही सुविधा त्याबद्दल माहिती घेऊया.

विनामुल्य 2 लाखांचा लाभ मिळणार

पीएनबी बँकेकडून PNB Rupay Jan dhan Card ची सुविधा जन धन ग्राहकांना दिली जाते. या कार्डवर बँक ग्राहकांना 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विमा (Accidental Insuarance) सुविधा देत आहे. रुपे कार्डच्या मदतीने तुम्ही खात्यातून पैसे काढू शकता आणि खरेदी देखील करू शकता.

रिझर्व्ह बँकेने SBI ला ठोठावला 1 कोटींचा दंड, जाणून घ्या ग्राहकांवर काय होणार परिणाम

ट्रान्सफर करण्याचा पर्यायही उपलब्ध

बचत खात्याला (Saving Account) जन धन योजना खात्यात ट्रान्सफर करण्याचा पर्याय देखील आहे. ज्यांच्याकडे जन धन खाते आहे, त्यांना बँकेकडून RuPay PMJDY कार्ड मिळते. 28 ऑगस्ट 2018 पर्यंत उघडलेल्या जन धन खात्यांवर जारी केलेल्या RuPay PMJDY कार्डसाठी विमा रक्कम 1 लाख रुपये असेल. 28 ऑगस्ट 2018 नंतर जारी करण्यात आलेल्या RuPay कार्डवर 2 लाख रुपयांपर्यंत अपघाती विम्याचा फायदा उपलब्ध होईल.

क्लेम कसा करायचा ते जाणून घ्या?

या योजनेअंतर्गत पॉलिसीमध्ये भारताबाहेरील दुर्घटनेचाही समावेश आहे. आवश्यक कागदपत्रे सादर केल्यावर विमा रकमेनुसार दावा भारतीय रुपयांमध्ये भरला जाईल. कोर्टाच्या आदेशानुसार लाभार्थी कार्डधारक किंवा कायदेशीर वारसांच्या खात्यात नामनिर्देशित होऊ शकतो.

कागद नाही तर या पदार्थापासून तयार होतात नोटा; वाचून तुम्हालाही वाटेल आश्चर्य!

खाते कसे उघडायचे?

जर तुम्हाला तुमचे नवीन जन धन खाते उघडायचे असेल तर तुम्ही जवळच्या बँकेत जाऊन हे काम सहज करू शकता. यासाठी तुम्हाला बँकेत एक फॉर्म भरावा लागेल. नाव, मोबाईल नंबर, बँकेच्या शाखेचे नाव, अर्जदाराचा पत्ता, व्यवसाय / रोजगार आणि वार्षिक उत्पन्न, एसएसए कोड किंवा वॉर्ड क्रमांक, गाव कोड किंवा टाऊन कोड इत्यादी द्यावे लागतील.

First published:

Tags: Insurance, Pnb bank, Pradhan mantri jan dhan yojana