जाहिरात
मराठी बातम्या / मनी / ATM मधून फाटक्या नोटा निघाल्या तर डोंट वरी, अशा करता येतील चेंज

ATM मधून फाटक्या नोटा निघाल्या तर डोंट वरी, अशा करता येतील चेंज

एटीएममधून निघालेल्या फाटक्या नोटा कशा बदलायच्या

एटीएममधून निघालेल्या फाटक्या नोटा कशा बदलायच्या

एटीएममधून पैसे काढताना अनेकदा फाटलेल्या नोटा बाहेर येतात. यानंतर लोक त्रस्त होतात. कारण त्या नोटा ATM मध्ये परत ठेवता येत नाहीत आणि बाजारातील दुकानदार त्या घेत नाहीत. अशा वेळी काय करायचं ते पाहूया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 22 मे : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने ATM मधून निघालेल्या फाटलेल्या जुन्या नोटा बदलण्यासाठी नियम केले आहेत. नियमांनुसार, बँक एटीएममधून निघालेल्या फाटक्या नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकत नाही. तुम्ही त्या सहज बदलू शकता आणि त्यासाठी कोणते चार्जही आकारले जाणार नाही. जुलै 2016 मध्ये रिझर्व्ह बँकेने एका सर्कुलरमध्ये म्हटले होते की, जर इतर बँकांनी खराब नोटा बदलून घेण्यास नकार दिला तर त्यांना 10,000 रुपयांचा दंड होऊ शकतो. हा नियम सर्व बँक शाखांना लागू आहे. रिझर्व्ह बँकेच्या म्हणण्यानुसार, एटीएममधून खराब किंवा बनावट नोट बाहेर पडल्यास त्याची जबाबदारी बँकेची असेल.

News18लोकमत
News18लोकमत

रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार एटीएममधून बाहेर पडणाऱ्या नोटेमध्ये कोणत्याही प्रकारचा दोष आढळल्यास त्याची बँक कर्मचाऱ्यांकडून चौकशी करण्यात यावी. नोटेवर जर सीरियल नंबर, महात्मा गांधींचा वॉटरमार्क आणि गव्हर्नरची शपथ दिसली नाही तर बँकेला कोणत्याही परिस्थितीत नोट बदलावी लागेल. फाटलेल्या नोटांबाबत रिझर्व्ह बँक वेळोवेळी सर्कुलर जारी करत असते. कोणत्याही बँकेच्या शाखेत किंवा रिझर्व्ह बँकेच्या कार्यालयात तुम्ही अशा नोटा किती सहजतेने बदलू शकता याची लिमिट आहे. रिझर्व्ह बँकेच्या नियमांनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी जास्तीत जास्त 20 नोटा बदलू शकतात. तसेच या नोटांची एकूण किंमत 5000 रुपये आहे.

FD वर कुठं मिळतंय जास्त व्याज? या बँका देताय जबरदस्त ऑफर

जळलेल्या किंवा खूप जास्त फाटलेल्या नोटा बदलल्या जाऊ शकत नाहीत. अशा नोटा रिझर्व्ह बँकेच्या इश्यू ऑफिसमध्येच जमा केल्या जाऊ शकतात. एटीएममधून फाटलेल्या नोटा बदलण्यासाठी तुम्हाला ज्या बँकेच्या एटीएममधून नोटा बाहेर आल्या त्या बँकेत जावे लागेल. तिथे गेल्यावर तुम्हाला अर्ज लिहावा लागेल. ज्यामध्ये तुम्हाला पैसे काढण्याची तारीख, वेळ, ठिकाण याची माहिती लिहावी लागेल. अर्जासोबत एटीएममधून ट्रांझेक्शन संबंधित मिळालेली स्लिपही जोडावी लागेल. जर स्लिप जारी केली नसेल, तर मोबाईलवर मिळालेला ट्रांझेक्शनचे डिटेल्स द्यावे लागतील. यानंतर तुमच्या नोटा बँकेद्वारे बदलल्या जातील.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: ATM
  • First Published :
जाहिरात
जाहिरात