मुंबई**, 0****7** ऑगस्ट: 8व्या वेतन आयोगाबाबत (8th Pay Commission News) एक मोठं अपडेट समोर आलं आहे. केंद्रातील मोदी सरकारनं 8 व्या वेतन आयोगाचा लाभ आता मिळणार की नाही याची पुष्टी केली आहे. सरकारी कर्मचाऱ्यांचा संभ्रम दूर करत राज्यमंत्री पंकज चौधरी यांनी 8 वा वेतन आयोग आणण्याबाबत अद्याप कोणताही विचार सुरू नसून तो आणण्याचा कोणताही विचार केला जात नसल्याचं म्हटलं आहे. पंकज चौधरी यांनी एका प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं की, सध्या 8 वा वेतन आयोग आणण्याबाबत कोणताही विचार केला जात नाही आणि असं कोणतेही नियोजन नाही. केंद्र सरकारचे कर्मचारी आणि पेन्शनधारकांचे वेतन, भत्ते आणि पेन्शनमध्ये सुधारणा करण्यासाठी 8 व्या वेतन आयोगाच्या घटनेचा विचार केला जात नाही. ते म्हणाले की, सातव्या वेतन आयोगाच्या शिफारशीनुसार, केंद्र सरकारचे कर्मचारी आणि निवृत्तीवेतनधारकांना दिलं जाणारं वेतन, भत्ते आणि निवृत्ती वेतन यांचा आढावा घेण्यासाठी दुसरा वेतन आयोग स्थापन करण्याची गरज नाही. 8 वा वेतन आयोग आणण्यास नकार दिला नाही- केंद्रीय मंत्री पंकज चौधरी म्हणाले की, पे मॅट्रिक्सचे पुनरावलोकन आणि पुनरावृत्तीसाठी नवीन प्रणालीवर काम केलं पाहिजे. मात्र, त्यांनी 8 वा वेतन आयोग आणण्याची शक्यता नाकारली नाही. कर्मचाऱ्यांच्या कामगिरीच्या आधारे पगार वाढावा यासाठी सरकारकडून अशी व्यवस्था करण्यात येत आहे. यासाठी सरकार नवीन वेतन मेट्रिक्स लागू करू शकतं. हेही वाचा- EPFO: जुन्या कंपनीचा PF कसा करायचा विलीन? फक्त 5 मिनिटांचं आहे काम, नंतर मिळेल मोठं व्याज DA बाबत नवी अपडेट- मिळालेल्या माहितीनुसार, सरकार नव्या दिशेनं काम करत आहे. अशी व्यवस्था 68 लाख केंद्रीय कर्मचारी आणि 52 लाख निवृत्ती वेतनधारकांसाठी केली जाईल, ज्यामध्ये डीए 50 टक्क्यांपेक्षा जास्त असल्यास पगारात स्वयंचलित सुधारणा होईल. सरकार यासाठी ‘ऑटोमॅटिक पे रिव्हिजन सिस्टिम’ बनवू शकते. अशा स्थितीत केंद्रीय कर्मचाऱ्यांना मोठा लाभ मिळण्याची अपेक्षा आहे. कर्मचाऱ्यांना काय फायदा होणार? या वेतन पातळी मॅट्रिक्सवरून, स्तर 1 ते 5 पर्यंतच्या केंद्रीय कर्मचार्यांचे किमान वेतन 21 हजारांदरम्यान असू शकतं. दुसरीकडे वेतन आयोगाच्या आदेशावर नजर टाकली तर येत्या काही वर्षांत कर्मचाऱ्यांना नव्या प्रणालीनुसार पगारात वाढ होणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.