मुंबई, 6 फेब्रुवारी : एअर इंडिया (Air India) गेल्या काही महिन्यांपासून सातत्याने चर्चेत आहे. या सरकारी कपंनीची मालकी 7 दशकांनंतर पुन्हा टाटा ग्रुपकडे (Tata Group) गेली आहे. मात्र सध्या चर्चेत असलेल्या एअर इंडियाचं नाव कसं निश्चित केलं गेलं याबाबत अनेकांना माहिती नसेल. टाटा ग्रुपने स्वत: याबाबत ट्विवटरवर माहिती दिली आहे. देशातील पहिल्या विमान कंपनीचे नाव निवडण्यासाठी टाटा कंपनीच्या कर्मचाऱ्यांमध्ये 75 वर्षांपूर्वी ओपिनियन पोल घेण्यात आला होता. त्याच्याकडे 4 नावांची निवड होती, त्यापैकी शेवटी एअर इंडिया हे नाव निवडले गेले होते. सुमारे 7 दशकांपूर्वी एअर इंडिया टाटांचा हातून सरकारकडे गेली होती. अवघ्या 10 दिवसांपूर्वी टाटा समूहाने औपचारिकपणे एअर इंडियावर ताबा मिळवला आहे. टाटा समूहाने रविवारी या विमान कंपनीच्या इतिहासाविषयी मनोरंजक माहिती शेअर केली. 1946 मध्ये टाटा सन्सचा भाग असलेल्या टाटा एअरलाइन्सचा कंपनी म्हणून विस्तार झाला. मग या कंपनीचे नाव निवडायचे होते. टाटा समूहाने रविवारी ट्वीट करत माहिती दिली की, भारतातील पहिल्या विमान कंपनीच्या नावासाठी इंडियन एअरलाइन्स, पॅन-इंडियन एअरलाइन्स, ट्रान्स-इंडियन एअरलाइन्स आणि एअर इंडिया हे पर्याय होते.
(1/2):Back in 1946, when Tata Air Lines expanded from a division of Tata Sons into a company, we also had to name it. The choice for India’s first airline company came down to Indian Airlines, Pan-Indian Airlines, Trans-Indian Airlines & Air-India. #AirIndiaOnBoard #WingsOfChange pic.twitter.com/BKpmwyAMim
— Tata Group (@TataCompanies) February 6, 2022
75 वर्षांपूर्वी ओपिनियन पोल घेण्यात आला टाटा समूहाने अनेक ट्वीट केले आणि टाटाच्या 1946 च्या मासिक बुलेटिनमधील अंशांसह दोन छायाचित्रे देखील शेअर केली. एअर इंडियानेही हे ट्वीट रिट्विट केले आहेत. बुलेटिनमध्ये म्हटले आहे की एअरलाइनच्या नावाच्या निवडीसाठी ओपिनियन पोल घेण्याचा विचार हाती घेण्यात आला आहे. यासाठी टाटा समूहातील कर्मचाऱ्यांमध्ये नोटिंग पेपरचे वाटप करण्यात आले. एअर इंडियाला सर्वाधिक मते मिळाली त्यात म्हटले आहे की, पहिल्या मतमोजणीत एअर इंडियाच्या बाजूने 64, इंडियन एअरलाइन्सच्या बाजूने 51, ट्रान्स इंडियन एअरलाइन्ससाठी 28 आणि पॅन-इंडियन एअरलाइन्सच्या बाजूने 19 मते पडली. शेवटच्या मतमोजणीत एअर इंडियाच्या बाजूने 72 आणि इंडियन एअरलाइन्सच्या बाजूने 58 मते पडली. यावर्षी 27 जानेवारी रोजी, टाटा समूहाने एअर इंडिया, त्याची उपकंपनी एअर इंडिया एक्सप्रेसचे अधिकृत नियंत्रण घेतले. समूहाने AISATS या संयुक्त उपक्रमात 50 टक्के भागभांडवलही विकत घेतले आहे.

)







