मुंबई, 9 सप्टेंबर : भारतात लवकरच 5G इंटरनेट सेवा सुरू होणार आहे. टेलिकॉम कंपन्यांची ऑक्टोबरपासून मोठ्या शहरांमध्ये 5G सेवा देण्याची योजना आहे. युजर्स 5G इंटरनेट स्पीड आणि सेवा कशी असेल याबद्दल उत्सुक आहेत. अशात आता 5G इंटरनेटचे रिचार्जच्या किमतीवरुनही अंदाज बांधायला सुरुवात झाली आहे. सध्या, रिलायन्स जिओ (Reliance Jio), एअरटेल (Airtel) किंवा व्होडाफोन आयडिया (Vodafone Idea) उर्फ Vi असो, कोणत्याही टेलिकॉम कंपनीने 5G प्लॅनच्या किमतींबद्दल अद्याप कोणतीही अधिकृत माहिती उघड केलेली नाही. आतापर्यंत समोर आलेले अनेक रिपोर्टनुसार असं दिसतंय की 5G योजनांसाठी, वापरकर्त्यांना 4G प्लॅनपेक्षा थोडा अधिक खिसा रिकामा करावा लागणार आहे. पण प्रत्येकाच्या मनात एकच प्रश्न आहे, शेवटी किती खर्च करावा लागणार? कसे असतील प्लान? इकॉनॉमिक टाइम्सच्या रिपोर्टनुसार, 5G प्लॅनच्या किमती कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले जात आहेत आणि त्यासाठी स्मार्टफोन आणि टेलिकॉम कंपन्या एकमेकांशी हातमिळवणी करत आहेत. वापरकर्त्यांना परवडणाऱ्या किमतीत 5G अनुभव मिळावा हाच यामागचा उद्देश असल्याचे सांगितले जात आहे. वाचा - एकापेक्षा अधिक बँक अकाउंट्स असणं योग्य की अयोग्य? जाणून घ्या तज्ज्ञांना सल्ला हँडसेट आणि टेलिकॉम एक्झिक्युटिव्हचा हवाला देऊन ही माहिती दिली जात आहे. कंपन्या अशा प्लॅनवर काम करत आहेत की वापरकर्त्यांना एकाच रिचार्जवर OTT फायदे इत्यादीसह अमर्यादित डेटा प्रदान केला जाऊ शकतो. रियलमी-एअरटेलची हातमिळवणी रियलमी इंडियाचे सीईओ माधव सेठ यांनी माहिती दिली आहे की कंपनी एअरटेलच्या सहकार्याने सी सीरीज स्मार्टफोनसाठी योजना तयार करत आहे. रियलमी म्हणते की आम्ही टेलिकॉम कंपन्यांसोबत 5G ची चाचणी घेत आहोत आणि ग्राहकांना बंपर ऑफर देण्यासाठी देखील काम केले जात आहे. कंपनीचे म्हणणे आहे की इतर स्मार्टफोनसाठीही ही रणनीती तयार केली जात आहे. इतर हँडसेट कंपन्यांची रणनीती काय आहे? Vivo, Xiaomi, Samsung इत्यादी सारख्या बाजारात उपस्थित असलेल्या इतर कोणत्याही हँडसेट कंपन्यांनी अशा कोणत्याही भागीदारीबद्दल माहिती दिली नाही. त्यामुळे भविष्यात या कंपन्या कोणासोबत पार्टनशीर करतात हे पाहणंही महत्त्वाचं ठरणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.