असीम मनचंदा, नवी दिल्ली : सगळेच जण 5 जी सेवा कधी सुरू होणार याची आतूरतेनं वाट पाहात आहेत. अजून मोबाईलवर ही सेवा सुरू झाली नाही. 8 शहरांमध्ये सध्या प्रायोगिक तत्वावर ही सेवा सुरू करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार रिलायन्स जिओकडून 5G सेवेसाठी ट्रायल सुरू आहे. कंपनीकडून मिळालेल्या माहितीनुसार सध्या चार शहरांमध्ये ही सेवा सुरू करण्यात आली आहे. दिल्ली मुंबई कोलकाता आणि वाराणसी इथे बीटा सेवा सुरू करण्यात आली आहे. ज्यांना ही सेवा दिली आहे ती ट्रॅक केली जाईल. त्यानंतर ही सेवा सर्वसामान्यांसाठी उपलब्ध होईल.
तुमच्या फोनमध्ये 5G सिग्नल कधी येईल? तुम्हाला नवीन सिम कार्ड घ्यावं लागेल का? वाचा तुमच्या प्रश्नांची उत्तरंट्रायलदरम्यान याचा स्पीड 1gbps असेल अशी माहिती कंपनीकडून देण्यात आली आहे. हळूहळू संपूर्ण शहरात याचे सिग्नल मिळेल असंही सांगण्यात आलं आहे. १ ऑक्टोबर रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 5G चा शुभारंभ करण्यात आला होता.
एअरटेल आणि जिओ 5G सेवा लवकरच सुरू करणार आहेत. जिओकडून ट्रायल सुरु झाली आहे. २०२३ डिसेंबरपर्यंत प्रत्येक तालुक्यात 5G पोहोचवण्याचा मानस असल्याचं रिलायन्स जिओचे अध्यक्ष मुकेश अंबानी यांनी सांगितलं आहे.