नवी दिल्ली, 18 ऑक्टोबर : देशात नुकतीच 5G नेटवर्क सुविधा लॉंच करण्यात आली आहे. 5G नेटवर्कमुळे जबरदस्त इंटरनेट स्पीड मिळेल, असं सांगितलं जात आहे. सध्या देशातल्या काही निवडक शहरांमध्ये 5G नेटवर्क सुविधा सुरू करण्यात आली आहेत. लवकरच या सुविधेचा आणखी काही शहरांमध्ये विस्तार होईल. डिपार्टमेंट ऑफ टेलिकम्युनिकेशन्सने 5G लॉंच होण्यापूर्वी 13 शहरांची यादी जाहीर केली होती. पण आतापर्यंत मोजक्या शहरांमध्येच 5G सुरू झाले आहे. मात्र अजूनही अनेक स्मार्टफोनमध्ये 5G चा ऑप्शन मिळत नाही, संपूर्ण देशात ही नेटवर्क सुविधा कधी सुरू होणार असे अनेक प्रश्न लोकांच्या मनात आहेत. `आज तक`ने या विषयीची माहिती दिली आहे.
देशात 1 ऑक्टोबर 22 रोजी 5G नेटवर्क सुविधा सुरू झाली. सध्या 8 शहरांमध्ये ही सुविधा उपलब्ध आहे. जिओ ट्रु 5G सेवा चार शहरांमध्ये तर एअरटेल 5G प्लस सुविधा आठ शहरांमध्ये उपलब्ध आहे. डिपार्टमेंट ऑफ कम्युनिकेशन्स अर्थात डॉटने 5G लॉंच होण्यापूर्वी 13 शहरांची एक यादी जाहीर केली होती. त्यावेळी सुरुवातीला 13 शहरांमध्ये 5G सुविधा उपलब्ध होईल, असं सांगितलं गेलं. या यादीत अहमदाबाद, बेंगळुरू, चंडीगड, गांधीनगर, गुरुग्राम, हैदराबाद, जामनगर, कोलकाता, चेन्नई, लखनौ, पुणे, दिल्ली आणि मुंबईचा समावेश होता. मात्र या सर्व शहरांमध्ये अजूनही 5G सुविधा सुरू झालेली नाही. जिओ ट्रु 5G विषयी बोलायचं झालं तर या कंपनीची 5G सुविधा दिल्ली, मुंबई, कोलकाता आणि वाराणसीत लॉंच झाली आहे. दुसरीकडे एअरटेल 5G प्लस सुविधा दिल्ली, मुंबई, बंगळुरू, हैदराबाद, सिलीगुडी, नागपूर आणि वाराणसीत उपलब्ध आहे. या शहरांमध्ये 5G सुविधा सुरू करण्यात आली असून तिचा हळूहळू विस्तार केला जाणार आहे.
दरम्यान, ज्या शहरांमध्ये 5G सुविधा सुरू करण्यात आली आहे, त्या शहरांमधल्या सर्व युझर्सला ही सुविधा मिळत नसल्याचं चित्र आहे. हळूहळू सर्व यूजर्स या सुविधेचा लाभ घेऊ शकणार आहेत. एक ते दोन वर्षांत संपूर्ण देशात 5G नेटवर्क उपलब्ध होईल. 5G सुविधा देशभरात उपलब्ध करून देण्यासाठी जिओनं डिसेंबर 2023 पर्यंतचं उद्दिष्ट ठेवलं आहे. एअरटेलनं यासाठी मार्च 2024 पर्यंतचा कालावधी निश्चित केला आहे. युझर्सला 5G सुविधेचा लाभ घेण्यासाठी नवीन सिम कार्ड घेण्याची आवश्यकता पडणार नाही. जुन्या सिम कार्डवरच युझर्सला 5G नेटवर्क सुविधा मिळेल, असं सांगितलं जात आहे.
Airtel और Jio 5G की सर्विस इन शहरों में जल्द होगी शुरू? पहले ही जारी हुई थी लिस्ट
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: 5G, Network, Reliance, Smart phone