Home /News /money /

आता Zomato आणि Swiggy या कंपन्यांना भरावा लागणार टॅक्स; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

आता Zomato आणि Swiggy या कंपन्यांना भरावा लागणार टॅक्स; ग्राहकांवर काय होणार परिणाम?

झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या (Food delivery App) सेवांसाठी 5 टक्के GST कर भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे.

नवी दिल्ली 18 सप्टेंबर : जीएसटी काउन्सिलच्या (GST Council meeting) 45 व्या बैठकीत शुक्रवारी (17 सप्टेंबर 2021) काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. त्यामध्ये झोमॅटो (Zomato) आणि स्विगी (Swiggy) या ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या (Food delivery App) सेवांसाठी 5 टक्के GST कर भरणं बंधनकारक करण्यात आलं आहे. या कंपन्यांना कराच्या कक्षेत आणण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला. या बैठकीनंतर केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सांगितलं की फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मना त्यांच्याकडून दिल्या जाणाऱ्या रेस्टॉरंट सेवेवर जीएसटी द्यावा लागेल. ऑर्डरच्या डिलिव्हरीवेळी हा कर लावला जाईल. त्याचबरोबर कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक्स व ज्युसवर 28 टक्के +12 टक्के जीएसटी लागू होईल. हे निर्णय 1 जानेवारी 2022 पासून लागू होतील. ग्राहकांच्या डोक्याला ताप जीएसटी काउन्सिलचा नवा निर्णय अर्थमंत्री सीतारामन यांनी घोषित केल्यानंतर सोशल मीडियावर (Social Media) फूड चेनच्या माध्यमातून पदार्थ मागवणाऱ्या ग्राहकांनी चर्चा करायला सुरुवात केली. या करामुळे ग्राहकांच्या डोक्याला ताप होईल अशी भावना ते व्यक्त करत होते. उलट-सुलट चर्चांना उधाण आलं होतं. तेवढ्यात सरकारकडून स्पष्टीकरण आलं की या नव्या सुधारणेमुळे कुठलाही नवा कर (No new Tax) या सेवेवर लावलेला नाही त्यामुळे ग्राहकांना घरपोच सेवा मिळत असली तरीही त्याचा भुर्दंड त्यांना सोसावा लागणार नाही. फरक एवढाच होईल की खाद्यपदार्थांच्या टॅक्समध्ये वाढ झाल्याने काही पदार्थांचे दर वाढू शकतील. आता या तारखेपर्यंत पूर्ण करा PAN-Aadhaar लिंक करण्याचं काम, काय आहे डेडलाइन? ग्राहकांना बसणार नाही फटका जीएसटी काउन्सिलच्या बैठकीनंतर महसूल सचिव तरुण बजाज म्हणाले, ‘फूड डिलिव्हरी सेवेतील 5 टक्के करामुळे ग्राहकांना कोणताही फटका बसणार नाही. कारण इथं फक्त कर लागू करण्याचं स्थान बदललं आहे. आधी खाद्यपदार्थ देणाऱ्या रेस्टॉरंटकडून जीएसटी (GST) घेतला जात होता तो बदलून आता घरपोच सेवा देणाऱ्या कंपन्यांना कर द्यावा लागणार आहे. त्यामुळे यात कुठलाही नवा कर लागू केलेला नाही. आता जर तुम्ही या ॲपवरून ऑर्डर दिलीत तर रेस्टॉरंट तुमच्याकडून कर घेतं आणि सरकारकडे जमा करतं. पण आम्हाला लक्षात आलं की ही रेस्टॉरंट कर बुडवत आहेत. त्यामुळे आम्ही ॲप चालवणाऱ्या कंपन्यांना कर लागू केला त्या आता ग्राहकांकडून कर घेऊन तो सरकारकडे जमा करतील त्यामुळे नवा कर कुठेच लावला गेलेला नाही हे तुमच्या लक्षात येईल.’ Petrol Price: पेट्रोल-डिझेलचे नवे दर जारी, काय आहेत महत्त्वाच्या शहरातील भाव खाद्यपदार्थांमध्ये कार्बोनेटेड फ्रूट ड्रिंक (Carbonated Fruit Drinks) महागली आहेत. त्यावर आता 28% GST आणि 12% कॉम्पेनसेशन सेस लागू होणार आहे. आतापर्यंत या ड्रिंकवर केवळ 28 टक्के GST आकारला जात होता. त्या व्यतिरिक्त आइस्क्रीमवर आता 18 टक्के कर लावला जाणार आहे, त्यामुळे आइस्क्रीम महागणार आहे. तसंच गोड सुपारी आणि कोडेट वेलदोडा या उत्पादनांवर सध्या असलेला 5% GST आता वाढवून 18% करण्यात आला आहे. त्यामुळे ही उत्पादनं महाग होणार आहेत.
First published:

Tags: Food, Swiggy, Zomato

पुढील बातम्या