मराठी बातम्या /बातम्या /कोरोना वायरस /

'कोरोनामध्ये पैशांचा काहीच उपयोग नाही'; पुलावरुन पैशांचा पाऊस, VIDEO मधून दिसेल गंभीर स्थिती

'कोरोनामध्ये पैशांचा काहीच उपयोग नाही'; पुलावरुन पैशांचा पाऊस, VIDEO मधून दिसेल गंभीर स्थिती

गरीबांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंतच्या घरात कोरोनाचा कहर सुरू आहे. यात अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत.

गरीबांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंतच्या घरात कोरोनाचा कहर सुरू आहे. यात अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत.

गरीबांपासून ते अगदी श्रीमंतांपर्यंतच्या घरात कोरोनाचा कहर सुरू आहे. यात अनेकांचे हकनाक बळी गेले आहेत.

  • Published by:  Meenal Gangurde

गुजरात, 4 मे : गुजरातमधील भारूचमध्ये एक हैराण करणारं प्रकरणं समोर आलं आहे. येथील अंकलेश्वरमध्ये अचानक ब्रीजवर पोहोचलेल्या एका व्यक्तीने आपल्या खिशातून पैसे काढून फेकण्यास सुरुवात केली. सुरुवातील ही व्यक्ती काय करीत आहे, हे लोकांना कळलंच नाही. हा तरुण ब्रीजवरुन पैसे फेकत होता. ‘कोरोना काळात पैशांचा काहीच उपयोग नाही’, असं ती व्यक्ती पैसे फेकत असताना म्हणत होती. अगदी गरीबांपासून ते श्रीमंतांपर्यंत अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. यात अनेकांचे जीवही गेले आहेत. खिशात पैसे असतानाही रुग्णांचे जीव वाचवणे शक्य झाले नाही. अशातच गुजरातमधील हा व्हिडिओ पाहून तुमच मन भरून येईल.

ही व्यक्ती ब्रीजवर चढून पैशांची उधळण करीत होती. हे कृत्य पाहून घटनास्थळी मोठी गर्दी जमा झाली. काही वेळानंतर या व्यक्तीने ब्रीजवरुन उडी मारण्याचाही प्रयत्न केला. घटनास्थळी असलेल्यांनी त्याला वेळीच अडवलं.

हे ही वाचा-अलर्ट! कोरोनाबरोबरच नव्या आजारामुळे नाशिक हादरलं; आतापर्यंत 24 जणांचा बळी

पीडित व्यक्ती अंकलेश्वर येथे राहणारी आहे. ती मानसिक तणावाचा सामना करीत आहे. जेव्हा तो ब्रिजवर पोहोचला तेव्हा तो शांत उभा होता. त्यानंतर त्याने आपल्या खिशातून पैसे काढले आणि ते उडवू लागला. यादरम्यान तो कोरोना काळात पैशांचा उपयोग नसल्याचं म्हणत होता. त्यानंतर तो अचानक ब्रीजच्या कठड्यावर चढला आणि उडी मारण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र वेळेत त्याला पकडण्यात आलं आणि ब्रीजवरुन खाली उतरविले.

भारतात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं (Second Wave of Corona) अक्षरशः थैमान घातलं आहे. ही लाट अत्यंत भयानक ठरण्याचं आणखी एक कारण म्हणजे मृत्यूचं वाढलेलं प्रमाण (Coronavirus Death Rate) . मागील 14 दिवसांमध्ये देशात मृतांची संख्या 185 टक्क्यांनी वाढली आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या कोविड ट्रॅकरनुसार, देशात सध्या दररोज साधारणतः 3417 जणांचा मृत्यू होत आहे. चार आठवड्यांआधी हा आकडा 787 च्या जवळपास होता.

First published:

Tags: Corona updates, Gujrat, Video viral