जाहिरात
मराठी बातम्या / मनी / पोस्ट ऑफिसमध्येही जमा करु शकता 2 हजारांची नोट? बदलताही येतील का? घ्या जाणून

पोस्ट ऑफिसमध्येही जमा करु शकता 2 हजारांची नोट? बदलताही येतील का? घ्या जाणून

दोन हजारांची नोट पोस्टात जमा करता येते का?

दोन हजारांची नोट पोस्टात जमा करता येते का?

तुम्ही बँकेतून दोन हजार रुपयांच्या नोटा बदलून घेऊ शकता आणि तुमच्या खात्यातही जमा करू शकता. ज्याचं पोस्ट ऑफिसमध्ये अकाउंट आहे ते तिथे बदलू शकता का? जाणून घेऊया.

  • -MIN READ Mumbai,Maharashtra
  • Last Updated :

नवी दिल्ली, 25 मे : भारतीय रिझर्व्ह बँकेने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतलाय. दिलासादायक गोष्ट म्हणजे 2000 रुपयांच्या नोटा तात्काळ प्रभावाने बेकायदेशीर झाल्या नाहीत. ज्यांच्याकडे 2,000 रुपयांच्या नोटा आहेत ते 30 सप्टेंबर 2023 पर्यंत बदलू शकतात. म्हणजेच तुम्ही 4 महिन्यांपर्यंत 2000 रुपयांची नोट बदलू शकता किंवा तुमच्या बँक खात्यात जमा करू शकता. 2000 च्या नोटा बदलून बँका आणि रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयात जमा केल्या जात आहेत. पण, पोस्ट ऑफिसमध्येही या नोटा बदलल्या जातील का, हा मोठा प्रश्न आहे. पोस्ट ऑफिसमध्येही मोठ्या प्रमाणात लोकांचं अकाउंट असल्याने हा प्रश्न निर्माण होतोय.

News18लोकमत
News18लोकमत

रिझर्व्ह बँकेने जारी केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांमध्ये स्पष्टपणे नमूद केले आहे की, 2000 रुपयांची नोट फक्त बँका आणि आरबीआयच्या 19 क्षेत्रीय कार्यालयांमध्ये (आरओ) बदलली जाऊ शकते. यामध्ये पोस्ट ऑफिसचा उल्लेख नाही. याचा अर्थ पोस्ट ऑफिसमध्ये नोट बदलण्याची सेवा उपलब्ध नाही. पण तुम्ही तुमच्या पोस्ट ऑफिस खात्यात 2000 रुपयांची नोट नक्कीच जमा करू शकता. कारण 2000 ची नोट लीगल टेंडर आहे. म्हणूनच ते घेण्यास कोणीही नकार देऊ शकत नाही. मात्र, ज्या पोस्ट ऑफिस खातेदाराने नोट जमा केली आहे, त्याच्या खात्याची केवायसी असणे आवश्यक आहे.

2000 रुपयांच्या नोटांविषयी PNB ने जारी केली गाइडलाइन, पाहा काय म्हटलंय?

नोटांचे एक्सचेंज सुरु

23 मे 2023 पासून, बँक शाखा आणि भारतीय रिझर्व्ह बँकेच्या प्रादेशिक कार्यालयांनी 2000 रुपयांच्या नोटांची देवाणघेवाण सुरू केली आहे. रिझर्व्ह बँकेच्या मर्यादेनुसार, एखादी व्यक्ती एकावेळी 20,000 रुपयांपर्यंतच्या नोटा बदलू शकते. या चलनात रक्कम जमा करण्याची मर्यादा नाही. ज्यांचे बँक अकाउंट नाही ते देखील 2000 ची नोट बदलू शकतात. नोटा बदलण्यासाठी बँक खाते आवश्यक नसल्याचे आरबीआयने स्पष्ट केले आहे. तुम्ही कोणत्याही बँकेच्या शाखेत जाऊन 2000 च्या 10 नोटा बदलू शकता.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात