जाहिरात
मराठी बातम्या / मनी / 2 हजारांच्या नोटा खपवण्यासाठी असाही 'गोल्डन चान्स', सराफ बाजारात गर्दी

2 हजारांच्या नोटा खपवण्यासाठी असाही 'गोल्डन चान्स', सराफ बाजारात गर्दी

सराफ दुकानात ग्राहकांची गर्दी

सराफ दुकानात ग्राहकांची गर्दी

२००० च्या नोटबंदीचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा जळगावच्या सुवर्ण नगरीवर सुद्धा परिणाम झाला आहे.

  • -MIN READ Jalgaon,Jalgaon,Maharashtra
  • Last Updated :

नितीन नांदुरकर प्रतिनिधी जळगाव : RBI ने 2000 रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला. 30 सप्टेंबरपर्यंत 2 हजार रुपयांच्या नोटा बदलून मिळणार आहे. मात्र 20 हजार रुपयांपेक्षा जास्त नोटा असल्यास अडचणी येऊ शकतात. अशावेळी ज्यांच्याकडे 2 हजार रुपयांच्या नोटा आहेत त्यांच्यामुळे आता सराफ बाजारात अच्छे दिन आल्याचं पाहायला मिळत आहे. २००० च्या नोटबंदीचा शासनाने घेतलेल्या निर्णयाचा जळगावच्या सुवर्ण नगरीवर सुद्धा परिणाम झाला आहे. भविष्यात नागरिकांकडे असलेल्या दोन हजारांच्या नोटा बँकेत बदलविण्याचा त्रास वाचवण्यासाठी नागरिक त्या दोन हजारांच्या नोटांचा सोन्यामध्ये खरेदी करून गुंतवणूक करण्याची शक्यता आहे. त्यामुळे या निर्णयाचा साहाजिकच सराफ बाजारावर सुद्धा परिणाम होणार आहे.

News18लोकमत
News18लोकमत
2000 रुपयांच्या नोटा बँकेने न स्वीकारल्यास काय कराल?

दोन हजारांची नोटा बदलाव्या साठी लोकांचा सोने खरेदीवर वळतील, त्यामुळे परिणामी सोन्याचे भाव वाढतील, असं मत सराफ व्यवसायिकांनी बोलताना व्यक्त केलं. थोडासा त्रास होईल मात्र शासनाचा हा निर्णय निश्चितच चांगला असून यामुळे काळा पैसा बाहेर पडेल असेही सराफ व्यावसायिकांचं म्हणणं आहे.

2000 Note : किती नोटा छापायच्या हे कोण ठरवतं, कुठे छापल्या जातात?

बँकेत नोटा बदलण्याचा जो त्रास होणार आहे तो त्रास वाचवण्यासाठी त्या नोटाच्या बदल्यात सोने खरेदी करून घेतली, सोन खरेदीमुळे ती एकप्रकारे गुंतवणूक आहे.. शासनाने निर्णय अत्यंत घाईघाईत घेतला त्यामुळे त्याचा निश्चितच सर्वसामान्य जनतर परिणाम होणार आहे असं मत सोने खरेदीसाठी आलेल्या ग्राहकांनी व्यक्त केला आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात