मुंबई : रिझर्व्ह बँकेने दोन हजार रुपयांच्या नोटा चलनातून रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे या नोटा वैध राहणार नाहीत असा नसून, त्या सप्टेंबर 2023 अखेर बँकेत जमा करायच्या आहेत. पण त्या निमित्ताने नोटा छापण्याचे अधिकार व त्यांचा छपाई ते नष्ट होण्याचा प्रवास समजून घेऊयात. देशात कोणत्या वर्षी किती नोटा छापल्या जातील याचा अंतिम निर्णय भारत सरकार घेतं. मात्र, सरकार याबाबत वरिष्ठ अर्थतज्ज्ञांशी चर्चाही करतं. परवानगी मिळण्याची प्रक्रिया 2 टप्प्यांत केली जाते. पहिल्या टप्प्यात आरबीआय नोटा छपाईसाठी केंद्र सरकारकडे अर्ज पाठवतं. यानंतर, सरकार आरबीआयच्याच वरिष्ठ अर्थतज्ज्ञांच्या मंडळाशी चर्चा करतं. यानंतर आरबीआयला नोटा छापण्याची परवानगी दिली जाते. अशा प्रकारे सरकार, बोर्ड आणि आरबीआय नोट छपाईला परवानगी देण्यासाठी एकत्र काम करतात.
पुन्हा नोटबंदी! 2000 हजारांची नोट बँकेत कधीपासून जायचं बदलायला? काय आहे नियमयामध्ये साहजिकच सरकारला अधिक अधिकार आहेत. वर्षभरात किती रुपयांच्या किती नोटा छापायच्या हे फक्त सरकार ठरवते. त्याचं डिझाईन आणि सुरक्षा मानकंही सरकार ठरवतं. त्याचबरोबर 10,000 रुपयांपर्यंतच्या नोटा छापण्याचा अधिकार रिझर्व्ह बँकेला आहे. यापेक्षा मोठ्या नोटा छापण्यासाठी आरबीआयला सरकारची परवानगी घ्यावी लागते. नोटा छापण्याचे निकष सरकार आणि आरबीआय अनेक बाबी लक्षात घेऊन नोटा छापण्याचा निर्णय घेतात. यामध्ये जीडीपी, विकास दर आणि वित्तीय तूट हे घटक लक्षात घेतले जातात. या आधारे कितीही नोटांची छपाई करता येते. 1956 मध्ये मिनिमम रिझर्व्ह सिस्टिमची सुरूवात करण्यात आली. या अंतर्गत नोटा छापण्यासाठी आरबीआयला नेहमी 200 कोटी रुपये रिझर्व्ह ठेवावे लागतात.
RBI on 2000 Rupees Note : 2000 ची नोटबंदी, बँकेत एकाच वेळी किती पैसे भरता येणार?या रिझर्व्हमध्ये 115 कोटी रुपयांचं सोनं आणि 85 कोटी रुपयांचं परकीय चलन असावं. आरबीआयला कोणत्याही परिस्थितीत डिफॉल्टर घोषित केले जाऊ नये म्हणून हे केलं जातं. RBI चे गव्हर्नर धारकाला नोटेच्या किमतीएवढी रक्कम देण्याचे आश्वासन देतात. त्याच वचनासाठी ही रिझर्व्ह सिस्टिम आहे.
छपाई ते नष्ट होण्यापर्यंतचा प्रवास भारतातील नाशिक, देवास, म्हैसूर आणि सालबानी इथं नोटा छापल्या जातात. त्यानंतर या नोटा बँकांमध्ये वितरित केल्या जातात. बँक या नोटा विविध माध्यमांद्वारे (कॅश काउंटर, एटीएम) सामान्य लोकांपर्यंत पोहोचवते. त्यानंतर अनेक वर्षे या नोटा चलनात राहतात. नोटा लोकांच्या माध्यमातून इकडे तिकडे जातात व फाटतात. मग लोक पुन्हा एकदा या नोटा बँकांमध्ये घेऊन जातात आणि जमा करतात. या बँकांकडून पुन्हा आरबीआयकडे पोहोचतात. बाद झालेल्या नोटा आरबीआय नष्ट करते आणि आरबीआयने अवैध ठरवलेल्या नोटा जरी अस्तित्वात असल्या तरीही त्याला किंमत नसल्याने तो फक्त एक कागदाचा तुकडा ठरतो. आता नोटांची स्थिती पाहता त्या पुन्हा जारी करायच्या की नष्ट करायच्या याचा निर्णय आरबीआय घेते. अशा प्रकारे नोटांचा छपाई ते नष्ट होण्याचा प्रवास असतो.