18 सप्टेंबर : भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्या महाराष्ट्र दौर्याचा आजचा दुसरा दिवस आहे. अमित शहा आज कोल्हापूरला जाणार आहेत. सकाळी पाऊणे नऊच्या सुमाराला ते कोल्हापूर विमानतळावर पोहोचतील. तिथून ते महालक्ष्मी मंदिरात जाऊन देवीचं दर्शन घेणार आहेत. विमानतळावर भाजप कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित राहून त्यांच्या स्वागताची जंगी तयारी करण्यात आली आहे. कोल्हापुरात त्यांची स्वागत सभाही होणार आहे, पण शहा कोल्हापूरमध्ये शहा थोडावेळच असतील, त्यानंतर ते पुण्याला जाणार आहेत. तिथून ते नगर जिल्ह्यातल्या चौंडीला रवाना होती. चौंडीलाला आमदार पंकजा मुंडे यांच्या संघर्ष यात्रेच्या समारोपाला ते हजर राहणार आहेत.
भाजप अध्यक्ष अमित शहा राहणार उपस्थितीत आमदार पंकजा मुंडेंच्या 'संघर्ष यात्रे'चं आज समारोप होणार आहे. अहिल्यादेवी होळकरांच्या जन्मगावी म्हणजेच चौंडीमध्ये या यात्रेचा समारोप होणार आहे. जिजाऊं मातेच्या जन्मस्था सिंदखेडराजा पासून या यात्रेची सुरूवात झाली होती.
अमित शहांचा कार्यक्रम
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
बातम्यांच्या अपडेटसाठी कनेक्ट राहा आमच्या फेसबुक पेज आणि टिवट्र अकाऊंटसोबत
[if0] | Follow @ibnlokmattv[sc0] |
+++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++++
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Amit Shah, BJP, Shivsena, Udhav thakare, उद्धव ठाकरे, जागावाटप, भाजप, महायुती, महायुतीची बैठक, महाराष्ट्र, शिवसेना