मुंबई, 13 सप्टेंबर: ओबीसी आरक्षणाशिवाय (OBC reservation) नागपूर, अकोला ,वाशिम ,धुळे, नंदुरबार या 5 जिल्हा परिषद आणि 33 पंचायत समितीच्या निवडणूक घेतल्या जाणार आहेत. राज्य निवडणूक आयोगानं स्पष्ट केलं आहे. लवकरच निवडणुकीचा कार्यक्रम स्थगितीच्या टप्प्यावरून पुढे सुरू केला जाणार आहे. 18 जुलैला होणाऱ्या या निवडणूक 9 जुलैला स्थगित करण्यात आल्या होत्या. सर्वोच्च न्यायालयाच्या दिशानिर्देशानुसार राज्य सरकार सोबत चर्चा करून तेव्हा निवडणूक आयोगाने या निवडणूक रद्द केल्या होत्या. आता लवकरच निवड करुन स्थगित कार्यक्रमावरून पुढे घेतल्या जाईल. अतिमुसळधार पावसाचा इशारा; पालघर, ठाणे जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट शनिवारी सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला निवडणूक रद्द करण्याचा अधिकार नसल्याचे आदेश देताच निवडणूक आयोग सक्रिय झालं असून पुढच्या 3 ते 4 दिवसात स्थगित कार्यक्रम पुढे सुरू करण्याची घोषणा होऊ शकते. कोरोनासंदर्भातील शासनाची अधिसूचना ही निवडणूक आयोगाला निवडणुका घेण्यापासून रोखू शकत नाही व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचा पूर्ण अधिकार हा आयोगाचाच आहे, असं सर्वोच्च न्यायालयानं निकाल दिला. त्यामुळे शनिवारी आलेल्या या निकालानंतर पोटनिवडणुकीचा मार्ग मोकळा झाला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.