मुंबई, 4 ऑगस्ट : पुरंदर (Purandar) तालुक्यात सापडलेल्या झिका व्हायरसच्या (Zika virus) रुग्णाला भेटायला केंद्रीय टीम (Central government team) जाणार असून त्यांच्याकडून राज्य सरकारला (state government) सूचना दिल्या जातील, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (Health minister Rajesh Tope) यांनी दिली आहे. झिका व्हायरसचे इतरत्र संक्रमण झालेले नसून घाबरून जाण्याचे कारण नसल्याचं टोपे यांनी म्हटलं आहे.
पुरंदर तालुक्यात झिका व्हायरसचा रुग्ण आढळून आल्यामुळे राज्यभरात खळबळ उडाली आहे. कोरोनापाठोपाठ आता झिका व्हायरसचे संकट महाराष्ट्रासमोर असल्याची चर्चा सुरु झाली आहे. या पार्श्वभूमीवर झिका व्हायरसला घाबरून न जाता काळजी घेण्याची गरज असल्याचं आरोग्यमंत्र्यांनी म्हटलं आहे. पावसाचं पाणी साठू देऊ नये, भांड्यात साठलेलं पाणी वेळोवेळी बदलावं, भांडी कोरडी ठेवावीत आणि आपल्या घराच्या परिसरात पाणी साचणार नाही, याची नागरिकांनी खबरदारी घ्यावी, अशा सूचना टोपेंनी दिल्या आहेत.
सांगली-सातारा-कोल्हापुरात वेगाने लसीकरण
पश्चिम महाराष्ट्रातील सांगली, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी होत नसल्याचं चित्र आहे. त्यामुळे त्या भागातील लसीकरणाचा वेग वाढवण्यावर सरकार भर देत असल्याचं ते म्हणाले. राज्याच्या वाट्याच्या अधिकाधिक लसी या तीन जिल्ह्यांत पाठवण्यात येतील, अशी माहिती त्यांनी दिली.
केंद्राकडून पुरवठा कमी
मुंबईत लसीचा दुसरा डोस मिळत नसून केंद्र सरकारकडून पुरेशा प्रमाणात लसी उपलब्ध होत नसल्याचं त्यांनी म्हटलं आहे. याबाबतची सर्व माहिती पोर्टलवर उपलब्ध असून लसींचा पुरवठा वाढवण्यासाठी केंद्र सरकारला पत्र लिहिणार असल्याचंही त्यांनी माध्यमांना सांगितलं. पुढे सणासुदीचा काळ सुरु होत असून लवकरात लवकर अधिकाधिक नागरिकांचं लसीकरण पूर्ण होणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले.
हे वाचा -MPSC च्या संयुक्त पूर्व परीक्षेची तारीख अखेर जाहीर; या दिवशी होणार
लोकलबाबत मुख्यमंत्र्यांकडे बोट
मुंबईतील ज्या नागरिकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे, त्यांना लोकल प्रवासाची मुभा देण्यात यावी, अशी मागणी होत असून त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सर्व परिस्थितीचा विचार करून निर्णय घेतील, असं सांगत त्यांनी चेंडू मुख्यमंत्र्यांकडे टोलवण्याचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Corona vaccination, Mumbai local, Rajesh tope, Zika