मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /खोपोलीत धबधब्यात भिजणे जिवावर बेतले, 2 महिलांचा मृत्यू; 8 वर्षांचा चिमुरडा बेपत्ता

खोपोलीत धबधब्यात भिजणे जिवावर बेतले, 2 महिलांचा मृत्यू; 8 वर्षांचा चिमुरडा बेपत्ता

 Zenethi waterfall : एकूण तीन पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर पर्यटकांना रेस्क्यु करण्यात यश आले.

Zenethi waterfall : एकूण तीन पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर पर्यटकांना रेस्क्यु करण्यात यश आले.

Zenethi waterfall : एकूण तीन पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर पर्यटकांना रेस्क्यु करण्यात यश आले.

रायगड, 28 सप्टेंबर : राज्यभरात पावसाने (maharashtra rain updates) धुमशान घातले आहे. नदी,नाले आणि तलाव तुडुंब भरून वाहत आहे. काही ठिकाणी पाण्यात वाहून गेल्याच्या घटना घडला आहे. रायगड (raigad) जिल्ह्यातील खोपोलीतील (khopoli zenith waterfall) झेनिथ धबधब्याच्या प्रवाहात 3 पर्यटक वाहून गेले आहे. दोन महिला पर्यटकांचा मृत्यू झाला आहे तर आठ वर्षाचा चिमुरडा बेपत्ता आहे.  अजूनही शोध मोहिम सुरू आहे.

मिळालेल्या माहितीनुसार,  रायगड जिल्ह्यात कर्जत खालापुरमध्ये मुसळधार पाऊस सुरू आहे. खोपोलीतील झेनिथ वॉटरफॉल (khopoli zenith waterfall) हे पर्यटकांचे आवडते ठिकाण असून रोज येथे पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देत असतात. खोपोलीतील काही पर्यटक इथं आले होते.

झेनिथ धबधब्याच्या प्रवाहापासून निघाणाऱ्या नदीला आज सकाळपासूनच मोठ्या प्रमाणात पाणी वाहत होते. काही पर्यटक नदीचा प्रवाह ओलांडताना वाहुन गेले तर काही जण प्रवाहामध्ये अडकले होते. ही घटना कळताच खोपोली पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. स्थानिक कार्यकर्तेही मदतीला पोहोचले आहे.

एकूण तीन पर्यटक वाहून गेल्याची माहिती समोर आली आहे. तर इतर पर्यटकांना रेस्क्यु करण्यात यश आले. यामध्ये मेहरबानू खान (40 वर्षे)  रुबिना वेळेकर( 40) या महिला वाहून गेल्या आहे. तर आलमा खान हा 8 वर्षांचा  मुलगा बेपत्ता असून त्याचा शोध सुरू आहे. हे सर्व जण खोपोली परिसरात राहणारे आहे. यावेळी अडकलेल्या  १२ जणांशा रेस्क्यू करण्यात यश आले असून बेपत्ता चिमुरड्याची शोध मोहीम हाती घेण्यात आली आहे.

बंधाऱ्यात अडकलेल्या चारजणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश

दरम्यान, नांदेडमध्ये पुराच्या पाण्यात अडकलेल्या चार जणांना वाचवण्यात अग्निशमन दलाला यश आले आहे. नायगाव तालुक्यातील टाकळी येथील मन्याड नदीच्या बंधाऱ्यात चार जण अडकले होते. एक जण या बंधाऱ्यावर सुरक्षारक्षक म्हणून काम करतो.  इतर तीन जण मासेमारी करणारे होते. नायगाव तालुक्यात  सकाळपासून पाऊस सुरू आहे. दुपार नंतर मात्र मन्याडनदीत पाण्याची पातळी वाढली. प्रवाह देखील वाढत असल्याने चार जण बंधाऱ्यात अडकून पडले. नांदेड येथून तातडीने अग्निशमन दलाचे जवान बोटीसह टाकळी येथे पोहचले. शर्थीचे प्रयत्न करून बोटीद्वारे अडकलेल्या चार जणांना वाचवण्यात आलं.

First published: