मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पर्यटनस्थळी बंदी असतानाही धबधब्यावर गर्दी; अतिउत्साह बेतला जीवावर, बुडून एकाचा मृत्यू

पर्यटनस्थळी बंदी असतानाही धबधब्यावर गर्दी; अतिउत्साह बेतला जीवावर, बुडून एकाचा मृत्यू

45 year old man died after drowned in waterfall: अतिउत्साह एका पर्यटकाच्या जीवावर बेतला आहे. धबधब्यावर बुडून 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे.

  • Published by:  Sunil Desale

जव्हार, 10 जुलै : कोरोनाचा (Corona) प्रादुर्भाव कमी झाला असला तरी धोका अद्यापही कायम आहे तसेच संभाव्य तिसऱ्या लाटेचा धोका लक्षात घेता निर्बंध अद्यापही कायम आहेत. पर्यटनस्थळांवर बंदी घालण्यात आली आहे. मात्र, असे असतानाही अनेक उत्साही पर्यटक हे धबधबे, धरणावर मजामस्ती करण्यासाठी पोहोचत आहेत. आदेश झुगारुन पर्यटनस्थळी मजामस्ती करणं एका इसमाच्या जीवावर बेतलं (man die in waterfall) आहे.

पालघर जिल्ह्यातील जव्हार (Jawhar) येथे एका धबधब्यावर पिकनिकसाठी गेलेल्या 45 वर्षीय इसमाचा बुडून मृत्यू झाला आहे. मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार जव्हारमधली केळीचापाडा येथील काळमांडवी धबधब्यावर शनिवारी सकाळपासूनच पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. याच धबधब्यावर एका पर्यटकाचा बुडून मृत्यू झाला आहे.

"निष्पाप मुलीच्या हत्येचं पाप डोक्यावर असणाऱ्याला म्हणे पुन्हा मंत्रिपदाचे वेध लागलेत"

धबधब्यावर पोहोण्यासाठी गेलेल्या 45 वर्षीय इसमाचा मृत्यू झाला आहे. मृतकाचे नाव आदर्श धर्मा शंकर असे असल्याची माहिती समोर आली आहे. नवी मुंबईतील तो निवासी असल्याचं बोललं जात असून तो आपल्या मित्रांसोबत पिकनिकसाठी जव्हारमधील धबधब्यावर आला होता.

धबधब्यांवर पर्यटकांनी जावू नये, गर्दी करु नये असे प्रशासनाकडून आदेश काढण्यात आले आहेत. इतकेच नाही तर वारंवार प्रशासनाकडून हे आवाहनही करण्यात येते. पर्यटनस्थळांवर जाणाऱ्या रस्त्यांवर पोलीस बंदोबस्तही असतो मात्र, असे असतानाही अतिउत्साही पर्यटक हे नजर चुकवत धबधब्यांवर दाखल होत असल्याचं दिसत आहे.

First published:

Tags: Palghar