संजय राठोड इज बॅक? शिवसेनेच्या मंत्र्याचं मोठं विधान म्हणून मी नेहमी म्हटते हे सरकार बलात्काऱ्यांना आश्रय नाही तर राजाश्रय देण्याचं काम करत आहे. बलात्काऱ्यांना राजाश्रय देण्याचीच यांची मानसिकता आहे. राज्यातील महिला, मुली यांच्यावर सामूहिक बलात्कार होत आहेत. रोज घटना वाढत आहेत. इतकेच नाही तर पोलीस दलात ज्या महिला काम करत आहेत त्यांच्यावरही बलात्कार होत आहेत. हे विकृत कोणाचा दाखला देत आहेत असंही चित्रा वाघ म्हणाल्या. संजय राठोड यांचा पुन्हा मंत्रिमंडळात समावेश होईल अशी प्रतिक्रिया ज्यांनी दिली आहे त्यांचीही पार्श्वभूमी एकदा तपासून त्यांच्या बद्दल सत्यता तपासता येईल. म्हणजे सगळे चट्टेबट्टे कसे एक आहेत हे लक्षात येईल असे चित्रा वाघ म्हणाल्या.एका निष्पाप मुलीच्या हत्येचं पाप डोक्यावर असणार्याला म्हणे पुन्हा मंत्रीपदाचे वेध लागलेत…. ज्यांनी यावर प्रतिक्रिया दिली त्यांनाही एकदा तपासून घ्याचं…म्हणजे सगळे चट्टेबट्टे कसे एक आहेत हे लक्षात येईल…. pic.twitter.com/YgrzaIbJCR
— Chitra Kishor Wagh (@ChitraKWagh) July 10, 2021
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Chitra wagh, Sanjay rathod