प्रतीक बोराळे याचे 27 मेला लग्न होते. मात्र, 26 मेला म्हणजे लग्नाच्या आधीच्या दिवशी प्रतीकने नानमुखाचा कार्यक्रम होता. यावेळी प्रतीक वऱ्हाड्यांना सोडून गोठ्यात गेला.
बुलडाणा, 28 मे : सध्या लग्न (Marriage) जमलं की, प्री वेडिंग (Pre Wedding) आणि पोस्ट वेडिंग ट्रेंड (Post Wedding Trend) जोरात सुरू आहे. अनेक जण प्री वेडिंग आणि पोस्टमध्ये व्यस्त असतात. मात्र, एक नवरदेवाने प्री वेडिंग न करता एक वेगळाच प्रकार केला आहे. त्याने जे केलं त्याचं सर्वत्र केलं जात आहे.
या नवरदेव मुलाचे नाव प्रतीक बोराळे असे आहे. त्याने नानमुखाच्या दिवशी वऱ्हाडींना सोडून थेट नेहमीप्रमाणे म्हशीचे दूध काढायला प्राधान्य दिले. हा प्रकार मोताळा तालुक्यातील कोल्ही गवळी येथे घडला. प्रतीक बोराळे याचे 27 मेला लग्न होते. मात्र, 26 मेला म्हणजे लग्नाच्या एक दिवस आधी नानमुखाचा कार्यक्रम होता. यावेळी प्रतीक वऱ्हाड्यांना सोडून गोठ्यात गेला आणि तिथे म्हशीचे दूध काढले. यानंतर 26 मेच्या दिवशी नानमुखाचा कार्यक्रम झाला आणि 27 मेला त्याचे लग्न झाले.
म्हैस त्याला एकट्यालाच दूध काढू देते -
या घटनेतून प्रतीक कर्तव्यदक्ष आणि व्यवसायाशी प्रामाणिक असल्याचे दिसून आले आहे. तर या घटनेदरम्यान आणखी एक माहिती समोर आली. ती म्हणजे, त्यांच्या येथील म्हैस ही फक्त प्रतिकलाच एकट्याला दूध काढू देते. त्यामुळे त्याला नानमुखाचा कार्यक्रम सोडून दुढ काढावे लागले. तर आता लग्नानंतरही त्यालाच या म्हशीचे दूध काढावे लागणार आहे. त्यामुळे हे काम आपण आनंदाने करणार, असेही तो म्हणाला आहे.
हेही वाचा - Hanuman जन्मभूमीवरुन मतमतांतर; हनुमानाचा जन्म नेमका कुठे झाला? महंत गोविंद दास यांच्याकडून जन्मस्थळ सिद्ध करण्याचं महंतांना आव्हानपरिसर खव्यासाठी प्रसिद्ध -
बुलडाणा आणि मोताळा तालुका हा खव्यासाठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी अनेक शेतकरी पशुपालन हा जोडधंदा करतात. त्यामुळे दुध व्यवसायाने याठिकाणी चांगली भरारी घेतली आहे. याच दरम्यान, येथील खवाही चांगलाच प्रसिद्ध झाला आहे. दुधाच्या व्यवसायामुळे याठिकाणी मोठ्या प्रमाणात गायी, म्हशी पाहायला मिळतात.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.