जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / भावाच्या मृत्यूच्या धक्क्यानं धाकट्यानंही सोडला प्राण; भावांमधील प्रेम पाहून गावातील अन्य एकाचा मृत्यू

भावाच्या मृत्यूच्या धक्क्यानं धाकट्यानंही सोडला प्राण; भावांमधील प्रेम पाहून गावातील अन्य एकाचा मृत्यू

Representative Image

Representative Image

Washim News: उपचारादरम्यान रुग्णालयात थोरल्या भावाचा मृत्यू झाल्याची बातमी कळताच धाकट्या भावाचाही मृत्यू झाला आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

वाशिम, 28 जून: मागील काही दिवसांपासून देशात नैराश्याचं वातावरण आहे. कोरोना विषाणूमुळे अनेकांचा मृत्यू (Deaths) झाला आहे. दरम्यानच्या काळात अनेकांनी आपल्या जीवाभावाच्या माणसांना गमावलं आहे. आपली जवळची आणि हक्क्याची व्यक्ती आपल्याला सोडून गेल्यानं अनेकांनी आपलं आयुष्य देखील संपवलं आहे. तर काहींना आपल्या व्यक्तीचा विरह सहन न झाल्यानं त्यांचाही धक्क्यानं त्यांचाही मृत्यू झाला आहे. कोरोना काळात अशा अनेक घटना समोर आला आहे. अशीच एक हृदय पिळवटून टाकणारी घटना वाशिम जिल्ह्यात घडली आहे. वाशिम जिल्ह्यातील सोयजना येथील रहिवासी असणाऱ्या एका व्यक्तीचा काल उपचारादरम्यान रुग्णालयात मृत्यू झाला आहे. आपल्या भावाच्या निधनाची बातमी समजताच धाकट्या भावालाही हृदयविकाराचा (Heart attack) धक्का बसला. ज्यामध्ये त्यांचाही दुर्दैवी मृत्यू झाला. अवघ्या काही तासांच्या अंतरानं दोघा भावंडाच्या मृत्यूनं गावात हळहळ व्यक्त केली जात होती. दरम्यान या दोन भावांमधील अतूट प्रेम पाहून गहिवरलेल्या गावातील अन्य एका व्यक्तीचाही हृदयविकाराचा तीव्र झटका येऊन निधन झालं आहे. एकाच दिवशी गावात तीन लोकांच्या मृत्यूनं गावात शोककळा पसरली होती. जनार्दन सीताराम पवार (वय-75) असं उपचारादरम्यान मृत्यू झालेल्या मोठ्या भावाचं नाव आहे. ते मनोरा तालुक्यातील सोयजना येथील रहिवासी आहेत. मागील काही काळापासून ते विविध आजारांनी ग्रस्त होते. त्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण उपचारादरम्यान अचानक त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झाला आहे. हेही वाचा- …आणि 15 दिवसांच्या मुलीची हत्या करून विहिरीत फेकलं; तपासात धक्कादायक कारण मृत्यूनंतर जनार्दन यांचं पार्थिव घरी आणल्यानंतर धाकटा भाऊ मुरलीधर सीताराम पवार (वय-70) यांचंही हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं आहे. घरातील दोन वयोवृद्ध भावांचा मृत्यू झाल्यानं पवार कुटुंबीय पोरकं झालं आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात