जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दुकानात गेलेल्या तरुणीसोबत घडलं विपरीत; गळा आवळून खून करणाऱ्या चौघांना अटक

दुकानात गेलेल्या तरुणीसोबत घडलं विपरीत; गळा आवळून खून करणाऱ्या चौघांना अटक

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे.  (File Photo)

अकरावीत शिकणाऱ्या एका अल्पवयीन मुलीनं सोमवारी आपल्या आयुष्याचा शेवट केला आहे. (File Photo)

Dhule Crime : दुकानात जात असल्याचं सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह (Suspicious dead body found) सापडल्यानं शिरपूर याठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांतचं पोलिसांनी मृत्यूचं गूढ उलगडलं आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

धुळे, 15 जून: दुकानात जात असल्याचं सांगून घराबाहेर पडलेल्या तरुणीचा संशयास्पद मृतदेह (Suspicious dead body found) सापडल्यानं शिरपूर याठिकाणी एकच खळबळ उडाली आहे. अवघ्या काही तासांतचं पोलिसांनी मृत्यूचं गूढ उलगडलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी चार आरोपींना ताब्यात (4 men arrest) घेतलं आहे. मृतदेहाची माहिती देणारा तरुणच या प्रकरणातील मुख्य सूत्रधार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपींनी तरुणीची हत्या करण्यापूर्वी तिच्यासोबत गैरप्रकार केल्याची माहितीही पोलिसांनी दिली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस करत आहे. धुळे जिल्ह्यातील शिरपूर शहरात राहणारी 18 वर्षीय तरुणी आपण दुकानात जात असल्याचं सांगून घराबाहेर पडली होती. सायंकाळी उशीरपर्यंत ही तरुणी घरी आली नाही. त्यामुळे काळजीत पडलेल्या कुटुंबीयांनी तिची शोधाशोध करायला सुरुवात केली. जवळचे मित्र-मैत्रिणी आणि नातेवाईकांकडे विचारपूस केल्यानंतरही तरुणीचा काही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे कुटुंबीयांनी पीडितेची बेपत्ता झाल्याची तक्रार शिरपूर पोलीस ठाण्यात दिली. यानंतर शिरपूर पोलीस पथकाने बेपत्ता तरुणीचा शोध घ्यायला सुरुवात केली. दरम्यान शिरपूर शहराजवळील देवमोगरा कॉलनीजवळील एका झाडीत एका तरुणीचा मृतदेह आढळल्याची माहिती पोलिसांना मिळाली. रविंद्र कोकणी नावाच्या तरुणाने ही माहिती पोलिसांना दिली होती. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. तरुणीने स्कार्फने गळफास घेऊन आत्महत्या केली असावी, असं सांगत तरुणाने पोलिसांची दिशाभूल करायला सुरुवात केली. यामुळे पोलिसांना संबंधित माहिती देणाऱ्या तरुणावरच संशय आला. हे ही वाचा- शाळेत नेऊन अल्पवयीन मुलीवर बलात्कार; नागपूरातील 25 वर्षीय नराधमाला अटक याप्रकरणी पोलिसांनी मृतदेहाची माहिती देणाऱ्या रविंद्र कोकणीची चौकशी करायला सुरुवात केली. तेव्हा आरोपी कोकणीच्या माहितीमध्ये विसंगती आढळल्या. यानंतर पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवताच आरोपीनं गुन्ह्याची कबुली दिली आहे. या गुन्ह्यात सुरेश पावरा आणि कृष्णा पावरा यांच्यासोबत आणखी एका तरुणाचा समावेश असल्याची माहिती पोलिसांना दिली. या चार आरोपींनी मृत तरुणीवर सामूहिक बलात्कार करून तिची हत्या केली होती. त्यानंतर मुख्य आरोपी रविंद्र कोकणी याने तरुणीनं आत्महत्या केल्याचा बनाव रचला, याप्रकरणी पोलिसांनी चारही आरोपींना अटक केली असून पुढील तपास सुरू आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात