Home /News /maharashtra /

OLX वर केली दुचाकीची नोंदणी, टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली तरुणाने गंडवलं

OLX वर केली दुचाकीची नोंदणी, टेस्ट ड्राईव्हच्या नावाखाली तरुणाने गंडवलं

जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी टेस्ट राईडच्या (Test Ride) नावाखाली तरुण दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना घडली. कुणाल राजपूत असे आरोपी तरुणाचे नाव आहे. ही घटना 17 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विवेकानंद नगर (Vivekanand Nagar) भागात घडली.

पुढे वाचा ...
  जळगाव, 21 मे : जळगावमधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. याठिकाणी टेस्ट राईडच्या (Test Ride) नावाखाली तरुण दुचाकी घेऊन पसार झाल्याची घटना घडली. कुणाल राजपूत असे आरोपी तरुणाचे नाव आहे. ही घटना 17 मे रोजी सायंकाळी पाच वाजेच्या सुमारास विवेकानंद नगर (Vivekanand Nagar) भागात घडली. या प्रकरणी शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात (Ramanand Nagar Police Station) गुन्हा दाखल झाला आहे. नेमकं काय घडलं - ग्राहक असल्याचे सांगून टेस्ट राईडच्या नावाखाली एक तरुण दुचाकी घेऊन पसार झाला आहे. अक्षय मोरे नावाच्या एका तरुणाला आपल्या भावाची दुचाकी विकायची होती. ही दुचाकी तो महाविद्यालयात जाण्यासाठी ही वापरत असे. त्याला ही दुचाकी विकायची असल्यामुळे त्याने ओएलएक्स या अॅपवर नोंदणी केली. या दुचाकीचा क्रमांक एमएच 19 डीएल 4598 असा आहे. ओएलएक्सवर नोंदणी केल्यावर कुणाल राजपूत याने अक्षय मोरे याला फोन केला. तसेच दुचाकी खरेदी करायचे आहे, असे सांगितले. दुचाकीची फायरिंग चेक करुन येतो असं सांगितलं अन् - यानंतर दोघे जण जळगाव शहरातील वाघनगर स्टॉपजवळ भेटले. त्यानंतर कुणालने अक्षयजवळ टेस्ट राईडची मागणी केली. यावेळी या दुचाकीत पेट्रोल कमी होते. त्यामुळे पेट्रोल टाकल्यावर दोघे जण विवेकानंद नगरात आले. यावेळी दुचाकी हीट होत आहे. तिची फायरिंग चेक करुन येतो, असे कुणालने अक्षयला सांगितले. यानंतर आरोपी कुणाल राजपूत हा दुचाकी घेऊन फरार झाला. हेही वाचा -  दिवसाढवळ्या दुकानात सराफ व्यापाऱ्यावर चाकूने हल्ला, पुण्यातील घटनेचा LIVE VIDEO
  काही काळानंतर आपली फसवणूक झाल्याचे अक्षयच्या लक्षात आले. यानंतर त्याने थेट घर गाठत घडलेला संपूर्ण प्रकार आपल्या कुटुंबीयांना सांगितला. यानंतर गुरुवारी शहरातील रामानंद नगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास रामानंद नगर पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published:

  Tags: Bike riding, Jalgaon, Olx

  पुढील बातम्या