मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /चालू ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेलेली 20 वर्षीय तरुणी जागेवर परतलीच नाही, नंतर आढळली 'या' धक्कादायक अवस्थेत

चालू ट्रेनच्या टॉयलेटमध्ये गेलेली 20 वर्षीय तरुणी जागेवर परतलीच नाही, नंतर आढळली 'या' धक्कादायक अवस्थेत

राज्यातील पालघरमध्ये चालत्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये (Railway Toilet) तरुणीचा मृतदेह (Young Lade Dead Body) सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी रेल्वेच्या टॉयलेटमधून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

राज्यातील पालघरमध्ये चालत्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये (Railway Toilet) तरुणीचा मृतदेह (Young Lade Dead Body) सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी रेल्वेच्या टॉयलेटमधून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

राज्यातील पालघरमध्ये चालत्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये (Railway Toilet) तरुणीचा मृतदेह (Young Lade Dead Body) सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी रेल्वेच्या टॉयलेटमधून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे.

पालघर, 9 मे : राज्यातील पालघरमध्ये चालत्या रेल्वेच्या टॉयलेटमध्ये (Railway Toilet) तरुणीचा मृतदेह (Young Lade Dead Body) सापडल्याची घटना समोर आली आहे. पोलिसांनी रेल्वेच्या टॉयलेटमधून तरुणीचा मृतदेह बाहेर काढला आहे. तसेच या मृतदेहाच्या मानेवर फासही सापडला. हे आत्महत्येचे संशयास्पद प्रकरण असल्याचे पोलिसांचा अंदाज आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत तरुणी बिहारमधील रहिवासी होती. ती 20 वर्षांची होती. तिचे नाव आरती कुमारी पाल असे होते. ती रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस येथून स्वराज एक्स्प्रेसमध्ये चढली होती. ही रेल्वे जम्मू तावीच्या दिशेने जात होती. त्यात ही तरुणी बोगी क्रमांक 4 मध्ये प्रवास करत होती. काही वेळानंतर ती तरुणी टॉयलेटला गेली. मात्र, बराच वेळ झाला झाला. बराच वेळ ती जागेवर न परतल्याने लोकांना संशय आला. लोकांनी टॉयलेटचा दरवाजा ठोठावू लागला. मात्र, बराच वेळ होऊनही तरुणीने दरवाजा उघडला नाही.

त्यामुळे बराच वेळ दरवाजा न उघडल्याने लोकांनी टीसीला फोन करून सर्व प्रकार सांगितला. टीसीनेही दरवाजा उघडण्याचा खूप प्रयत्न केला. मात्र, आतून काहीच प्रतिसाद आला नाही. त्यामुळे दुपारी जवळपास 1.10 वाजताच्या सुमारास पालघरच्या डहाणू रोड रेल्वे स्थानकावर ही गाडी थांबवण्यात आली. यानंतर पोलिसांच्या मदतीने दरवाजा उघडला गेला. तर आतमध्ये तरुणीचा मृतदेह आढळून आला. तसेच तिच्या गळ्यात फासही दिसून आला.

हेही वाचा - बायकोचा सावळा रंग पतीला आवडला नाही, लग्नाच्या नऊ महिन्यांनंतरच धक्कादायक कृत्य

शवविच्छेदनाच्या अहवालाची प्रतीक्षा

पोलिसांनी आधार कार्डच्या मदतीने तरुणीची ओळख पटवली. तपासानंतर महिलेचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पालघर येथील डहाणूच्या कॉटेज रुग्णालयात पाठवण्यात आला. पोलीस आता शवविच्छेदन अहवाल येण्याची वाट पाहत आहेत.

तर याबरोबरच पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तरुणी महिला रेल्वेमध्ये चढली तेव्हा तिच्यासोबत एक मूल आणि एक पुरुष होता. मात्र, तिचा मृतदेह मिळण्यापूर्वीच दोन्ही गायब झाले. पोलीस हेसुद्धा तपास करण्याचा प्रयत्न करत आहेत की या महिलेसोबत कोणता पुरुष आणि मूल होते.

First published:
top videos

    Tags: Palghar, Train, Woman dead body