जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / दोन वर्षांपासून पत्नी, दोन मुली पाकिस्तानात अडकले, यवतमाळचा साजिद कुटुंबियांच्या भेटीसाठी कासावीस

दोन वर्षांपासून पत्नी, दोन मुली पाकिस्तानात अडकले, यवतमाळचा साजिद कुटुंबियांच्या भेटीसाठी कासावीस

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

लॉकडाऊनचा फटका सर्वांना सहन करावा लागला. त्यातून चिमुकले सुद्धा सुटले नाहीत. त्यामध्ये सध्या पाकिस्तानच्या कराचीत अडकून पडलेल्या आयशा आणि आमना या दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे.

  • -MIN READ
  • Last Updated :

यवतमाळ, 12 जून : वाढत्या कोरोनाच्या प्रकोपामुळे देशात मार्च 2020 ला लॉकडाऊनची घोषणा झाली. त्यामुळे संपूर्ण देश स्तब्ध झाला. लॉकडाऊनचा फटका सर्वांना सहन करावा लागला. त्यातून चिमुकले सुद्धा सुटले नाहीत. त्यामध्ये सध्या पाकिस्तानच्या कराचीत अडकून पडलेल्या आयशा आणि आमना या दोन चिमुकल्यांचादेखील समावेश आहे. या चिमुकल्यांचे वडील साजिद सयाणी आणि नानीला त्यांची आठवण सतावत आहे. तर तिकडे पाकिस्तानमध्ये चिमुकल्या वडिलांची वाट पाहत असून पितृछायेपासून अलिप्त आहेत. यवतमाच्या साजिद सयाणी या तरुणाचा विवाह इंटरनेटच्या माध्यमातून 2014 साली पाकिस्तानच्या कराची येथील जैनाब या तरुणीशी झाला. त्यानंतर ती भारतात आली. आणि या दोघांचा संसार सुरू झाला. दरम्यान त्यांना आयशा ही मुलगी झाली. सर्व संसार सुखात सुरू असताना कराचीत जैनाबच्या आईची प्रकृती बिघडली. त्यामुळे जैनाब आपला पती साजिद आणि मुलगी आयशा यांना घेऊन 1 सप्टेंबर 20180 रोजी आईच्या भेटीसाठी कराचीला गेली. त्यानंतर साजिदचा विजा मुदत बाह्य होत असल्याने त्याला परत यावं लागलं. जैनाबची प्रकृती ठीक नसल्याने आणि ती गर्भवती असल्याने तिला कराचीतच राहावं लागलं. दरम्यानच्या काळात जैनाबला दुसरी मुलगी झाली. ( बाल्कनीत रोमान्स करणं कपलला भलतंच महागात पडलं; व्हिडिओ समोर येताच महिलेला अटक ) त्यानंतर कोरोनाची साथ सुरू झाली आणि लॉकडाऊन लागला. परिणामी जैनाबला विजा मिळाला नाही. त्यातच लॉकडाऊनमुळे साजिदला विजासाठी कागदपत्रे पाठविण्यात अडथळे निर्माण झाले. त्यामुळे जैनाब दोन मुलींसह कराचीत अडकून आहे. सध्या मोठी मुलगी 6 वर्ष तर लहान 3 वर्षांची झाली आहे. जैनाबला तिच्या पतीकडे यायचे आहे तर दोन चिमुकल्यांना आपल्या वडिलांच्या कुशीत खेळायचे आहे. नातवंडांच्या आठवणीने आजी बेजार आहे. तर साजिद हा आपली पत्नी आणि दोन मुलींच्या भेटीसाठी आतुर आहे.

मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
  • First Published :
जाहिरात
जाहिरात