यवतमाळ, 18 एप्रिल: चारचाकी गाडी झाडावर जाऊन आदळल्याने भीषण अपघात झाला आहे. या अपघातात गाडीतील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला असून एक जण जखमी झाल्याची माहिती समोर येत आहे. यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरील पारवा गावाजवळ ही दुर्घटना (Yavatmal Accident) घडली.
अमरावती जिल्ह्यातील शिरसगाव येथील चार जण यवतमाळ-पांढरकवडा मार्गावरून आपल्या चारचाकी गाडीतून प्रवास करत होते. मात्र पारवा गावाजवळ त्यांची गाडी एका भल्यामोठ्या झाडाला धडकली आणि भीषण अपघात झाला. या अपघातात 3 जण जागीच ठार झाले तर एक जण गंभीर जखमी झाला. जखमीला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत. त्याला वाचवण्यासाठी डॉक्टरांकडून प्रयत्नांची पराकाष्ठा केली जात आहे.
हेही वाचा - COVID Second Wave: दुसरी लाट ठरतीये घातक, 1 ते 5 वयोगटातील बालकांमध्ये वाढलं संसर्गाचं प्रमाण
चालकाचे नियंत्रण सुटल्याने झाला अपघात?
हा अपघात नेमका कसा झाला, याबाबतची अधिकृत माहिती पोलिसांकडून अद्याप देण्यात आलेली नाही. मात्र चालकाचे नियंत्रण सुटल्यानेच गाडी झाडावर जाऊन आदळली आणि ही दुर्घटना घडली, असा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. अपघाताबाबत माहिती मिळताच वाहतूक पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांकडून आता पुढील कार्यवाही सुरू आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Maharashtra, Shocking news, Yavatmal, Yavatmal news