मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Yavatmal Crime : क्रूरतेचा कळस! यवतमाळ जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

Yavatmal Crime : क्रूरतेचा कळस! यवतमाळ जिल्ह्यात अल्पवयीन मुलीवर अत्याचार, आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल

यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथ ऐका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. (Yavatmal Crime)

यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथ ऐका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. (Yavatmal Crime)

यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथ ऐका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. (Yavatmal Crime)

  यवतमाळ, 17 ऑगस्ट : यवतमाळ जिल्ह्यातील नेर इथ एका अल्पवयीन मुलीवर दोन नराधमांनी अमानुष अत्याचार केल्याची घटना उघडकीस आली. (Yavatmal Crime) या प्रकरणी नेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

  पिडीत मुलीचे आई, वडील मोलमजूरीसाठी बाहेर गेले असता मुलगी पाणी भरण्यासाठी कुपनलिकेवर गेली होती. दरम्यान आरोपीने मुलीला पडक्या घरात नेऊन तिच्यावर अत्याचार केला. आई वडील कामाहून परत आल्यानंतर मुलीने घडलेला प्रकार सांगितला.

  हे ही वाचा : धक्कादायक! पत्नीला मारहाण केल्याचा संताप, घरमालकाने भाडेकरूला खाली फेकलं

  त्यावरून पोलिसात तक्रार दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी या प्रकरणी भा. द. वी. चे कलम 376 सह पोकसो अंतर्गत गुन्हा दखल केला आहे. दरम्यान राज्यात बलात्कारांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे. याविरोधात कडक कायदा करूनही नराधमांची कृत्ये काही कमी होताना दिसत नाहीत. यवतमाळ जिल्ह्यातील नेर येथे घडलेल्या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दरम्यान आरोपींवर योग्य ती कारवाई व्हावी अशी मागणीही ग्रामस्थांकडून करण्यात आली आहे.

  मॅट्रिमोनिअल साईटवरील ओळख पडली महागात

  पुण्यात सातत्याने गुन्हेगारी संबंधित बातम्या समोर येत आहे. एका महिलेची भरदिवसा भोसरीत चाकूने भोसकून हत्या करण्यात आली होती. यानंतर पुण्यातून आणखी एक संतापजनक घटना समोर आली आहे. एका घटस्फोटीत महिलेला लग्नाचे आमिष दाखवून तिच्यावर बलात्कार केला. यातून गर्भवती राहिल्यानंतर जबरदस्तीने गर्भपात देखील करण्यात आल्याचे समोर आले आहे.

  हे ही वाचा : 9 महिने गर्भात वाढवलं आणि जन्मानंतर 2 दिवसांत आईनंच संपवलं, नेमकं काय प्रकरण

  काय आहे प्रकरण ?

  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ही घटना नोव्हेंबर 2021 ते 8 ऑगस्ट 2022 या कालावधी दरम्यान, काळेवाडी, ताथवडे, वाकड़, जुनी सांगवी येथे या कालावधीत घडली. या प्रकरणी पीडित महिलेने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पीडितेने दिलेल्या फिर्यादीवरुन पोलिसांनी शैलेश दिपक पवळे (वय 24, रा. पोलीस लाईन बिल्डिंग, वाकड) या आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

  पीडित महिला ही घटस्फोटित आहे. तिची आणि आरोपीची यांची ओळख मॅट्रिमोनियल साईटवरून झाली होती. फिर्यादी या घटस्फोटित आहेत हे आरोपीला माहित होते. यानंतर त्याने या महिलेला लग्नाचे आमिष दाखवले. तसेच काळेवाडी, ताथवडे, वाकड आणि जुनी सांगवी परिसरातील हॉटलेमध्ये त्यांच्याशी शारिरीक संबंध ठेवले. यातून ही पीडित महिला गर्भवती राहिली. त्यामुळे त्याने पोटदुखीची गोळी म्हणून गर्भपाताची गोळी खाण्यास देऊन जबरदस्तीने गर्भपात घडवून आणला, असे फिर्यादीमध्ये म्हटले आहे.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Rape case, Rape news, Yavatmal, Yavatmal crime, Yavatmal news, Yavatmal vashim

  पुढील बातम्या