मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

9 महिने गर्भात वाढवलं आणि जन्मानंतर 2 दिवसांत आईनंच संपवलं, नेमकं काय प्रकरण

9 महिने गर्भात वाढवलं आणि जन्मानंतर 2 दिवसांत आईनंच संपवलं, नेमकं काय प्रकरण

आई आपल्या गर्भात बळाला 9 महिने वाढवते. त्याच्यासाठी ऊन, पाऊस वारा, शारीरिक मानसिक बदल  सहन करते. आपल्या पोटच्या गोळ्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून वेळ प्रसंगी ती वाघीणचं रुपही घेते.

  • Published by:  Kranti Kanetkar
सांगली : आई आपल्या गर्भात बळाला 9 महिने वाढवते. त्याच्यासाठी ऊन, पाऊस वारा, शारीरिक मानसिक बदल  सहन करते. आपल्या पोटच्या गोळ्यावर कोणतंही संकट येऊ नये म्हणून वेळ प्रसंगी ती वाघीणचं रुपही घेते. मात्र आईच बाळाच्या जन्मानंतर निष्ठूर बनली आणि अवघ्या दोन दिवसांच्या चिमुकलीचा तिने गळा घोटला अशी वेळ तिच्यावर का आली? नेमकं काय प्रकरण जाणून घेऊया. मुलगी शिकली प्रगती झाली. मुलगी वाचवा यासारख्या मोहिमा आजही अनेक ठिकाणी कागदांपुरत्याच मर्यादीत आहेत. आजही काही भागांमध्ये मुलगी झाली म्हणून छळ केला जातो. आईसाठी दोन्ही मुलं सारखी असतात असं म्हणतात. आईनंच 2 दिवसांच्या अर्भकाचा जीव घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलगी झाली म्हणून आईनंच दोन दिवसांच्या चिमुकलीची हत्या केली. या घटनेमुळे सांगली जिल्ह्यात खळबळ उडाली आहे. सुमित्रा जुट्टी असं आरोपी महिलेचं नाव आहे. ही महिला कर्नाटकची असून सांगलीतील रुग्णालयात 17 ऑक्टोबर 2020 रोजी प्रसूतीसाठी दाखल झाली होती. या महिलेनं एका गोंडस मुलीला जन्म दिला होता. मुलगी झाल्याने ती नाराज होती. तिने दोन दिवसांच्या मुलीचा ओढणीने गळा आवळून हत्या केली. मुलीची हत्या करताना एका महिलेनं पाहिलं होतं. या प्रकरणी तिने रुग्णालयातील डॉक्टरांनी पोलिसात तक्रार दाखल केली होती. सहाय्यक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी या प्रकरणाची सूत्र हाती घेऊन तपास केला आणि न्यायालयात आरोपपत्र दाखल केलं. या प्रकरणी न्यायालयाने आता निकाल दिला आहे. खटल्यामध्ये एकूण 10 साक्षीदारांना तपासण्यात आलं आहे. न्यायलयाने सगळे पुरावे पडताळून या महिलेला कठोर शिक्षा दिली आहे. या महिलेला जन्मठेप आणि 2 हजार रुपये दंड न्यायलयाकडून ठोठवण्यात आला आहे.
First published:

Tags: Crime news, Sangali

पुढील बातम्या