नेहाल भुरे, भंडारा, 26 जुलै : भंडारा जिल्ह्यात विहिरीतील कासवांना काढण्यासाठी गेलेल्या दोन तरुणांचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडलीय. लाखनी तालुक्यात गढपेंढरी इथं तीन तरुण विहीरीत कासवांना काढण्यासाठी उतरले होते. यापैकी एकाला वाचवण्यात यश आलं. महिलांनी अंगावरच्या साड्या सोडून एकाला वाचवलं, तर दोघांचा मृत्यू झाला. याबाबत मिळालेली माहिती अशी की, पावसाळ्याचे दिवस असून ग्रामीण भागात रोपलावण सुरू आहे. यासाठी वेगवेगळ्या भागातून शेतमजूर येतात. गढपेंढरी इथं अशोक गायधने यांच्या शेतात रोप लावण्यासाठी आले होते. तेव्हा जवळच असलेल्या पडक्या विहिरीत मजुरांना कासव दिसले. टोल का फोडला? अमित ठाकरेंसोबत तिथं नेमकं काय घोडलं? राज ठाकरे स्पष्टच बोलले VIDEO विहिरीतील कासवांना बाहेर काढण्यासाठी मंगेश जय गोपाल गोंधुळे (मेंढा भुगाव) आणि दयाराम सोनीराम भोंडे (मेंढा भुगाव), सुधीर मोरेश्वर हजारे हे तीन तरुण उतरले होते. पण विहिरीत गॅस असल्यानं तिघांनाही गुदमरायला लागलं. दरम्यान,विहिरीत उतरलेल्या तरुणांना गुदमरायला लागल्याचे लक्षात येताच महिलांनी आरडाओरड सुरू केली. विहिरीत अडकलेल्या तरुणांना बाहेर काढण्यासाठी कोणतेच साहित्य जवळपास नव्हते. तेव्हा प्रसंगावधान राखत शेतमजूर असलेल्या महिलांनी स्वत:च्या अंगावरच्या साडीचा दोर करून विहिरीत फेकला. महिलांना सुधीर मोरेश्वर हजारे या तरुणाचे प्राण वाचवता आला. मात्र दुर्दैवाने इतर दोन तरुणांचा यात मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







