मुंबई, 16 मार्च : सेट टॉप बॉक्स रिचार्जसंबंधी आलेली अडचण सोडवण्यासाठी ऑनलाइन नंबर शोधून त्यावर कॉल करणं महिलेला महागात पडलं. इंटरनेटवरून नंबर घेऊन महिलेनं त्यावर फोन केला. फोनवरील व्यक्तीने महिलेला तिच्या फोनमध्ये रिमोट एक्सेस अॅप घ्यायला लावलं. त्या अॅपच्या माध्यमातून महिलेच्या खात्यातून त्या व्यक्तीने तब्बल ८१ हजार रुपये काढून घेतल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत मिळालेली माहिती अशी की, विक्रोळी पूर्वेकडील कन्नमवार नगर इथे राहणाऱ्या ४७ वर्षांच्या महिलेने ५ मार्च रोजी सेट टॉप बॉक्स रिचार्ज केलं होतं. यासाठी तिने ९३१ रुपये भरले होते. मात्र पैसे जमा झाल्याचं तिला दिसले नाही आणि याचा मेसेजही तिला मिळाला नाही. एक दिवसानंतर तिने कस्टमर केअरला कॉल करण्यासाठी इंटरनेटवरून नंबर शोधला. डिझायनरने दिली एक कोटीच्या लाचेची ऑफर, अमृता फडणवीस यांची पोलिसांकडे तक्रार इंटरनेटवर मिळालेल्या नंबरवर महिलेनं कॉल केला. पण तिचा कस्टमर केअरशी संपर्क झाला नाही. त्यानंतर काही वेळाने तिला एका अनोळखी नंबरवरून कॉल आला. त्या व्यक्तीने कस्टमर केअरमधून बोलत असल्याचं सांगितलं. महिलेनं तिची समस्या त्या व्यक्तीला सांगितली. तेव्हा फोनवरून त्या व्यक्तीने रिमोट एक्सेस अॅप डाऊनलोड करायला सांगितलं. महिलेनं अॅप डाऊनलोड केल्यानंतर तिला ओटीपी आला. तो ओटीपी त्या व्यक्तीला शेअर केला. यानंतर काही वेळातच महिलेच्या खात्यातून पैसे काढल्याचे मेसेज मोबाईलवर आले. यानंतर फसवणूक झाल्याचं तिच्या लक्षात आलं. महिलेनं या प्रकरणी तिने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







