Home /News /maharashtra /

धक्कादायक! हॉटस्पॉट मुंबईतून महिला थेट अहमदनगरमध्ये दाखल, नागरिकांनी विरोध केल्यानंतर...

धक्कादायक! हॉटस्पॉट मुंबईतून महिला थेट अहमदनगरमध्ये दाखल, नागरिकांनी विरोध केल्यानंतर...

क्वारन्टाइनचा शिक्का मारलेल्या महिलेने मुंबई ते संगमनेर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

संगमनेर, 24 एप्रिल : धोकादायक कोरोना व्हायरसचा संसर्ग रोखण्यासाठी सरकारने लॉकडाऊनच्या कालावधीत वाढ केली आहे. तसंच जिल्ह्याच्या सीमा सील करून कठोर नियम केले आहेत. मात्र अशातच क्वारन्टाइनचा शिक्का मारलेल्या महिलेने मुंबई ते संगमनेर प्रवास केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. चारचाकी वाहनद्वारे महिलेनं हा प्रवास केला असल्याची माहिती आहे. जिल्हाबंदी असताना संबंधित महिलेने थेट मुंबईहून संगमनेरपर्यंत प्रवास कसा केला? असा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र भाजप आमदाराने दिलेले पत्र घेऊन महिलेने हा प्रवास केला असल्याची माहिती समोर आली आहे . ही महिला संगमनेरमध्ये दाखल होताच स्थानिकांनी तिला तीव्र विरोध केला. या विरोधानंतर महिला पुन्हा माघारी निघून गेल्याची माहिती आहे. नगरमध्ये वाढत आहे कोरोनाबाधितांची संख्या महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढतच चालली आहे. देशात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रातच आढळले आहे. अशातच शिर्डीमधून एक धक्कादायक बाब समोर आली आहे. नेपाळ येथून संगमनेर येथे आलेल्या 14 व्यक्ती पैकी 4 व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले आहे. त्यामुळे जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या आता 37 वर गेली आहे. 4 एप्रिल ला या व्यक्तींना एका इमारतीतून ताब्यात घेण्यात आले होते. त्यानंतर त्यांची तपासणी केली असता अहवाल निगेटिव्ह आले होते. हेही वाचा - कोरोनाच्या उपचारासंदर्भात चांगली बातमी, दिल्लीतील चाचणीला आलं मोठं यश मात्र, 14 दिवसानंतर 10 जणांचे अहवाल निगेटिव्ह तर 04 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह आले आहेत. या सर्व व्यक्तींना संगमनेर येथे संस्थात्मक देखरेखीखाली ठेवण्यात आले होते, या 4 व्यक्तींचा देखरेखीखाली असण्याचा कालावधी संपणार होता. त्यानंतर त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिले जाणार होते. संपादन - अक्षय शितोळे
Published by:Akshay Shitole
First published:

Tags: Coronavirus, Sangamner

पुढील बातम्या