मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /लालपरीचं स्टेरींग आता 'ती'च्या हाती! पहिल्यांदाच राज्यात महिला चालवणार ST बस

लालपरीचं स्टेरींग आता 'ती'च्या हाती! पहिल्यांदाच राज्यात महिला चालवणार ST बस

स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. आता लालपरीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती देण्यात येणार आहे.

स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. आता लालपरीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती देण्यात येणार आहे.

स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. आता लालपरीचे स्टेअरिंगही महिलांच्या हाती देण्यात येणार आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Maharashtra, India

पुणे, 31 जानेवारी : महाराष्ट्राच्या लालपरीच्या 72 वर्षांच्या इतिहासात पहिल्यांदाच महिला चालक एसटीचं स्टिअरिंग हाती घेणार आहेत. यासाठी पुणे विभागात 15 महिलांचे प्रशिक्षण सुरू आहे. यातील सहा महिलांचे पहिल्या टप्प्यातील प्रशिक्षण पूर्ण झाले आहे. आता दुसऱ्या टप्प्यातील महिला कर्मचारी प्रशिक्षण पूर्ण करून त्या मार्च अखेरपर्यंत सेवेत रुजू होणार आहेत.

मार्चनंतर लालपरीचे स्टेअरिंग महिलांच्या हाती -

स्त्री ही कुठल्याच क्षेत्रात मागे नाही. पुरूषाच्या बरोबरीने ती सगळीकडे उभी राहते. वेगवेगळ्या क्षेत्रात पुरूषांच्या पुढे जाऊन नाव लौकिक मिळवत आहेत. मात्र, काही क्षेत्र अजूनही आहेत जिथे पुरूषांचे वर्चस्व कायम आहे आणि ते क्षेत्र म्हणजे एसटी. महाराष्ट्राच्या एसटीमध्ये आजवर एकही महिला ड्रायव्हर नव्हती. आता एसटीचे सारथ्यही महिला करणार आहेत. महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाअंतर्गत येणाऱ्या पुणे विभागात एकूण 17 महिलांचे प्रशिक्षण सुरू झाले आहे. यातील सहा महिलांनी पहिल्या टप्प्यातील 3 हजार किलोमीटरचे प्रशिक्षण पूर्ण केले आहे. 27 डिसेंबरपासून या सहा महिला एसटी चालकांचे दुसऱ्या टप्प्यातील प्रशिक्षण सुरू आहे. हे प्रशिक्षण मार्चअखेर पूर्ण होईल आणि लालपरीचे स्टेअरिंग या महिलांच्या हाती येईल.

एसटी चालक होण्यासाठी दुचाकी आणि चारचाकी वाहन परवाना आवश्यक असतो.. या महिलांच्या वाहन परवान्यांची पूर्ण प्रकिया ही एसटी महामंडळाकडूनच पूर्ण करण्यात आलीय.. आता हे संपूर्ण प्रशिक्षण पूर्ण करुन या महिला एसटी चालकांची चाचणी होईल आणि यानंतर मार्च अखेरीस या महिला लालपरीतून प्रवाशांना घेवून जाण्यासाठी सज्ज होणार आहेत. या सेवेमध्ये प्रशिक्षण घेत असलेल्या महिलांचे बस चालवायचा प्रशिक्षण काळ सोपा नव्हता. या महिला वाहकांचे शिक्षण ऐकून तुम्हीही थक्क व्हाल. कुणी बँकेत सेल्स मॅनेजर होते. कुणाचे एमएसडब्ल्यू झाले आहे. तर कुणी इंजीनियरिंग पूर्ण करून सेवेत रुजू झाले आहेत.

सरळ सेवा 2019 अंतर्गत महिला चालकांची भरती करण्यात आली. यासाठी आता राज्यातील 21 आगारात 206 महिला चालक पात्र आहेत. पुणे, नागपूर, गडचिरोली, कोल्हापूर, भंडारा, नाशिक, गडचिरोली, जळगाव, नाशिक, औरंगाबाद, अमरावती, धुळे, सांगली अशा एकूण 21 आगारात सरळसेवा भरती करण्यात आली. यानंतर राज्यात 35 महिला मार्च अखेरपर्यंत एसटी महामंडळात चालक म्हणून रुजू होणार आहेत.

2019 मध्ये भरती झालेल्या या महिलांना चालक म्हणून त्यातही एसटीसारख्या मोठ्या बसचे चालक म्हणून तयार करणे हे सोपे काम नव्हते. सहा महिने सलग तब्बल 3 हजार किलोमीटर गाडी वेगवेगळ्या रस्त्यांनी घाटांनी चालवून या महिलांना चालक म्हणून तयार केले आहे. आम्हाला शून्यातून सुरेश हिडगे आणि खळदकर सरांनी घडवले आहे, असे या महिला सांगतात.

First published:

Tags: Pune, ST, St bus, Woman, Woman Driver