मुंबई, 28 मार्च : राज्याच्या गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर धक्कादायक घटना घडली आहे. मंत्रालयासमोर दोन महिलांनी आंदोलन केलं होतं. त्यावेळी एका महिलेनं विषप्राशन केलं होतं. या महिलेचा उपचारादरम्यान ह्रदयविकाराच्या धक्याने मृत्यू झाला आहे. तर दुसऱ्या महिलेची प्रकृती चिंताजनक आहे.
मंत्रालयासमोर सोमवारी धुळे आणि मुंबईतून आलेल्या दोन महिलांनी आंदोलन केलं होतं. शितल गादेकर आणि संगिता डवरे अशी आंदोलन करणाऱ्या महिलांची नाव आहे. शितल गादेकर यांनी मंत्रलायात प्रवेश दरम्यान विष प्राशन केलं होतं.
विष प्राशन करत करत असताना पोलिसांनी त्यांना रोखलं आणि ताब्यात घेतलं होतं. त्यानंतर लगेच हॉस्पिटलमध्ये दाखल केले. आज सकाळी
शितल गादेकर यांच्या वरती जेजे रुग्णालयात उपचार सुरू असताना हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची सूत्रांची माहिती आहे. संगीता डवरे यांना जेजे रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. त्या व्हेंटिलेटरवर असून त्यांच्यावर उपचार सुरू आहे.
काय आहे प्रकार?
सोमवारी मंत्रालयाच्या मुख्य गेट वरती शितल गादेकर आणि संगिता डवरे यांनी आंदोलन केलं होतं.शितल गादेकर या धुळे येथून आल्या होत्या. एमआयडीसीच्या प्लॉट संदर्भात आपली फसवणूक झाली अशी त्यांची तक्रार होती. यासाठी त्या मंत्रालयाच्या गेटसमोर आंदोनल करत होत्या. त्यावेळी गादेकर यांनी मंत्रालयाच्या गेट वरती विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता. तर त्याचवेळी नवी मुंबईहून आलेल्या संगिता डवरे यांनी हॉस्पिटलमध्ये फसवणूक झाल्या प्रकरणी कारवाई होत नाही म्हणून मंत्रालयाच्या गेटवर विष प्राशन करण्याचा प्रयत्न केला होता.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Mumbai