पंढरपूर, 01 ऑगस्ट: सोलापूर जिल्ह्यातील सांगोला याठिकाणी विजेचा शॉक (Electricity Shock) लागून एका वायरमनचा मृत्यू (Wireman Death) झाल्याची दुर्दैवी घटना समोर आली आहे. संबंधित वायरमनला विजेचा झटका बसल्यानंतर त्यांचा मृतदेह खांबावरच लटकून राहिला होता. ही घटना समोर येताच गावात एकच खळबळ उडाली आहे. हा अपघात नेमका कसा घडला? याबाबतची माहिती अद्याप समोर आली नाही. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.
शुभम शितोळे असं शॉक लागून मृत्यू झालेल्या वायरमनचं नाव आहे. मृत शितोळे हे वीज दुरुस्तीचं काम करण्यासाठी विजेच्या खांबावर चढले होते. दरम्यान त्यांचा विजेच्या तारांना धक्का लागला आणि हा अपघात घडल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून देण्यात आली आहे. विजेचा झटका बसल्यानंतर वायरमन शितोळे यांचा मृतदेह विजेच्या खांबावरच लटकून राहिला होता. यानंतर गावातील काही नागरिकांनी जेसीबीच्या साहाय्यानं हा मृतदेह खाली उतरवला आहे.
हेही वाचा-मित्रांना वैतागून उचललं धक्कादायक पाऊल; हायवेशेजारी लटकलेल्या अवस्थेत आढळला तरुण
संबंधित घटना सांगोला तालुक्यातील अहिल्यानगर अनकढाळ येथील आहे. ही घटना समोर येताच गावात हळहळ व्यक्त केली जात होती. याप्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. या घटनेचा तपास पोलीस करत आहेत.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.