Home /News /maharashtra /

'तुझी एखाद्या दिवशी सोय लावते' म्हणत पतीवर केले सपासप वार, कारण वाचून लावाल डोक्याला हात

'तुझी एखाद्या दिवशी सोय लावते' म्हणत पतीवर केले सपासप वार, कारण वाचून लावाल डोक्याला हात

Crime in Yavatmal: यवतमाळ जिल्ह्याच्या बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका महिलेनं भाजी कापायच्या चाकुने आपल्या पतीवर सपासप वार (Knife attack on husband) केले आहेत.

    यवतमाळ, 21 जानेवारी: यवतमाळ (Yavatmal) जिल्ह्याच्या बिटरगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत एक विचित्र घटना घडली आहे. येथील एका महिलेनं भाजी कापायच्या चाकुने आपल्या पतीवर सपासप वार (wife attack on husband with knife) केले आहेत. आरोपी महिलेनं पतीवर प्राणघातक हल्ला केल्यानंतर, घटनास्थळावरून पळ काढला होता. या हल्ल्यात पीडित पती गंभीर जखमी झाला असून त्याला उपचारासाठी रग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. बुधवारी पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत (attempt to murder) गुन्हा दाखल (FIR lodged) केला आहे. या घटनेचा पुढील तपास बिटरगाव पोलीस करत आहेत. नागोराव शिनकरे (वय-30) असं हल्ला झालेल्या फिर्यादी पतीचं नाव आहे. तर गंगा सागर शिनकरे असं गुन्हा दाखल झालेल्या 30 वर्षीय पत्नीचं नाव आहे. संबंधित दाम्पत्य उमरखेड तालुक्यातील करंजी येथील रहिवासी आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी रात्री आरोपी पत्नीनं घरी स्वयंपाक बनवला नव्हता. त्यामुळे फिर्यादीचा आपल्या पत्नीसोबत वाद झाला. यापूर्वी देखील या दाम्पत्यामध्ये किरकोळ कारणातून वाद व्हायचे. हेही वाचा-झोपेतच केला घात; पत्नीने अपंग पतीला दिला भयंकर मृत्यू,कोल्हापुरला हादरवणारी घटना घटनेच्या दिवशी दोघांमध्ये कडाक्याचं भांडण झालं. यावेळी आरोपी पत्नीने 'तुझी एखाद्या दिवशी सोय लावते' म्हणत पतीला धमकी दिली. यामुळे दोघांमधील वाद आणखी वाढत गेला. यातूनच संतापलेल्या पत्नीने भाजी कापायच्या चाकुने पतीच्या पोटावर सपासप वार केले आहेत. या हल्ल्यात फिर्यादी पती हे गंभीर जखमी झाले. या हल्ल्यानंतर घाबरलेल्या पत्नीनं घटनास्थळावरून पळ काढला आहे. हेही वाचा-गर्लफ्रेंडसोबत लग्न करण्यासाठी स्वत:च्याच हत्येचं रचलं कारस्थान; पोलीसही हैराण! या हल्ल्यानंतर आसपासच्या लोकांनी पती नागोराव यांना रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं. त्यांची प्रकृती सध्या स्थिर असून बुधवारी त्यांनी बिटरगाव पोलीस ठाण्यात पत्नीविरोधात फिर्याद दाखल केली आहे. पोलिसांनी खुनाचा प्रयत्नाच्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस करत आहेत.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Crime news, Yavatmal

    पुढील बातम्या