• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर अत्याचार उघड

साताऱ्यात अल्पवयीन मुलीवर चुलत भावाकडून बलात्कार; गर्भवती राहिल्यानंतर अत्याचार उघड

Rape in Satara: माण तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर दोन जणांनी वारंवार बलात्कार (Rape on minor girl) केल्याची घटना उघडकीस आली आहे. यातील एक आरोपी पीडित मुलीचा चुलत भाऊ आहे.

 • Share this:
  सातारा, 24 जून: माण तालुक्यात एका अल्पवयीन मुलीवर वारंवार बलात्कार (Rape on minor girl) केल्याची घटना समोर आली आहे. गावातील एक 19 वर्षीय तरुण मागील काही काळापासून पीडित मुलीला धमकी देऊन तिच्यावर अत्याचार करत होता. बदनामी होण्याच्या भीतीनं पीडित मुलगी सर्वकाही निमूटपणे सहन करत होती. पण ती सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानंतर अत्याचाराची ही घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पीडितेच्या आईनं दहिवडी पोलीस ठाण्यात बलात्काराचा तक्रार दाखल केला आहे. अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी पोलिसांनी दोन आरोपींना ताब्यात घेतलं आहे. कुणाल प्रकाश भोसले असं अटक केलेल्या 19 वर्षीय आरोपीचं नाव असून अन्य एक आरोपी अल्पवयीन आहे. धक्कादायक बाब म्हणजे संबंधित अल्पवयीन आरोपी हा पीडित मुलीचा चुलत भाऊ आहे. आरोपी कुणाल हा ऑक्टोबर 2020 पासून 13 वर्षीय अल्पवयीन मुलीला धमकी देऊन तिच्यासोबत शारीरिक संबंध ठेवत होता. कालांतराने या दोघांत सुरू असलेल्या संबंधांची माहिती पीडितेच्या 15 वर्षीय चुलत भावाला समजली. यानंतर आरोपी चुलत भावानं दोघांमधील संबंधाची माहिती नातेवाईकांना सांगण्याची धमकी देत, जबरदस्तीनं तिच्याशी शारीरिक संबंध (Minor girl raped by cousin) ठेवले. दरम्यान, मुलगी सहा महिन्यांची गर्भवती राहिल्यानं ही घटना उघडकीस आली आहे. घटनेची माहिती मिळाताच पीडितेच्या आईनं दहिवडी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. या गुन्ह्यातील संशयित आरोपींना अटक करण्यात आली आहे. हेही वाचा-एका रात्रीसाठी साडेचार लाखांत सौदा; 16 वर्षाच्या भाचीला विकणाऱ्या बारबालाला अटक दोन्ही संशयित आरोपींना अटक केल्यानंतर त्यांना न्यायालयात हजर करण्यात आलं. न्यायालयासमोर हजर केलं असता, न्यायालयानं एकोणीस वर्षीय संशयिताला पाच दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तर अन्य अल्पवयीन आरोपीला सातारा येथील बालसुधारगृहात पाठवण्यात आलं  आहे. या घटनेचा पुढील तपास दहिवडी पोलीस करत आहेत.
  Published by:News18 Desk
  First published: