जाहिरात
मराठी बातम्या / महाराष्ट्र / 'मुलांच्या जीवाशी खेळ..'; Zomato च्या 10 मि फूड डिलिव्हरी सेवेवर का संतापले रोहित पवार?

'मुलांच्या जीवाशी खेळ..'; Zomato च्या 10 मि फूड डिलिव्हरी सेवेवर का संतापले रोहित पवार?

'मुलांच्या जीवाशी खेळ..'; Zomato च्या 10 मि फूड डिलिव्हरी सेवेवर का संतापले रोहित पवार?

झोमॅटोच्या नव्या फूड डिलिव्हरी योजनेवर का नाराज झाले आमदार रोहित पवार?

  • -MIN READ Trending Desk
  • Last Updated :

    मुंबई, 22मार्च-   ऑनलाईन फूड ऑर्डर (Online Food Order) करणं हे आता काही नवीन राहिलेलं नाही. त्यासाठी विविध अ‍ॅप्सही आहेत. त्यातील झोमॅटो (Zomato) हे लोकप्रिय अ‍ॅप आहे. तुम्ही एखाद्या ठिकाणी ऑर्डर दिल्यावर काही ठरावीक वेळेत ती ऑर्डर तुम्हाला घरपोच किंवा तुम्ही मागवलेल्या ठिकाणी मिळेल अशी गॅरंटी दिलेली असते. लवकरातलवकर ती ऑर्डर दिली जावी यासाठी प्रयत्न असतात. पण आता झोमॅटोनं मात्र ग्राहकांसाठी वेळेबाबत एक खूशखबर आणली आहे. झोमॅटोवर फूड ऑर्डर केल्यानंतर आता त्याची डिलिव्हरी फक्त 10 मिनिटांतच (Food Delivery in 10 minutes ) दिली जाणार आहे. झोमॅटोचे सहसंस्थापक दीपिंदर गोयल (Deepinder Goyal) यांनी ट्विटररवरून याबाबतची माहिती दिली. अर्थात या निर्णयावरून टीकाही होऊ लागली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आमदार रोहित पवार यांनी यावरुन टीका केली आहे. देशात 10 मिनिटांत किराणा सामनाची डिलिव्हरी देणारं अ‍ॅप सुरु झालं आहे. त्यानंतर आता फूड ऑर्डरही 10 मिनिटांत मिळणार आहे. झोमॅटोच्या या 10 मिनिटांत फूड डिलिव्हरीची सुरुवात गुरुग्राममधून होणार असल्याचं दीपिंदर गोयल यांनी म्हटलं आहे. झोमॅटोचा पाठिंबा असणाऱ्या ब्लिंकिटबद्दल (Blinkit) (आधीचे ग्रोफर्स- Grofers) गेल्या वर्षी भरपूर तक्रारी होत्या. त्या पार्श्वभूमीवर आता गोयल यांनी ही घोषणा केली आहे. मात्र वेळेची मर्यादा असली तरी डिलिव्हरी एजंट्सच्या सुरक्षिततेबाबत कोणतीही तडजोड नसेल असंही त्यांनी स्पष्ट केलं आहे. “लवकर डिलिव्हरी देण्यासाठी आम्ही डिलिव्हरी करणाऱ्यांवर कोणत्याही प्रकारचा दबाव टाकणार नाही किंवा डिलिव्हरी द्यायला उशीर झाला तर त्यांना दंडही करणार नाही. वेळेची घाई असली तरी ती कोणाच्याही जीवाच्या बदल्यात नसेल,” असं गोयल यांनी म्हटलं आहे. पण नेमका हाच मुद्दा रोहित पवार (Rohit Pawar) य़ांनी उचलला आहे. त्यांनी ट्विट करून या निर्णयावर टीका केली आहे. डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं बहुधा गरीब कुटुंबातील असतात. 10 मिनिटांत फूड डिलिव्हरी देण्याची झोमॅटोची ही योजना म्हणजे त्यांच्या जीवाशी खेळ असल्याचं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. इतकंच नाही तर अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीनं या मुलांचा विमा उतरवणं गरजेचं असल्याचा सल्लाही त्यांनी दिला आहे.

    जाहिरात

    डिलिव्हरी बॉय म्हणून काम करणारी मुलं हे गरीब कुटुंबातील, विद्यार्थी असतात. 10 मिनिटात फूड डिलिव्हरी देण्याची @zomato ची सेवा म्हणजे या मुलांच्या जीवाशी खेळ आहे. अशी सेवा देण्यापूर्वी कंपनीने डिलिव्हरी बॉय च्या संपूर्ण सुरक्षेची काळजी घेणं व त्यांना विमा कव्हर देणं महत्त्वाचं आहे. (हे वाचा: पत्नीला डावलून भाजपने पतीला दिली उमेदवारी, आमदाराच्या पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल ) जास्त मागणी असलेल्या ग्राहक परिसरातच ही जलद डिलिव्हरी सेवा उपलब्ध असेल. या परिसरातच हे फिनिशिंग काउंटर्स (Finishing Counters) उभारले जातील. साधारणपणे कोणत्या पदार्थांना जास्त मागणी आहे त्याचा अंदाज घेऊन त्याप्रमाणे सुविधा सुरु करण्यात येईल. जेव्हा अन्न डिलिव्हरी पार्टनरकडून पिक-अप केलं जाईल तेव्हा ते निर्जंतुक केलेलं आणि गरम असेल याची खात्री केली जाईल असंही झोमॅटोकडून (Zomato) स्पष्ट करण्यात आलं आहे. लवकरातलवकर डिलीव्हरी देणारं रेस्टॉरंट कोणतं हे झोमॅटोवर सगळ्यांत जास्त वापरलं जाणारं फीचर आहे. त्यावर आधारितच ही इन्स्टंट फूड डिलिव्हरी सुरु करण्यात आल्याचं गोयल यांचं म्हणणं आहे. ऑर्डर केल्यानंतर ते मिळेपर्यंत अर्धा तास लागणं हे आता कालबाह्य होत चाललं आहे. आम्ही ते हद्दपार केलं नाही तर आणखी कोणीतरी करेल. त्यामुळे हा निर्णय घेतल्याचं सांगितलं जात आहे.अर्थात 10 मिनिटांत ऑर्डर मिळण्यासाठी काही अटी असतील. झोमॅटोच्या या नव्या 10 मिनिट्स फूड डिलिव्हरी कसा प्रतिसाद मिळतो, हे बघणं महत्त्वाचं आहे.

    मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
    • First Published :
    जाहिरात
    जाहिरात