ठाणे, 17 जानेवारी : कळवा खारेगांव उड्डाणपुलाच्या (Kharegaon flyover) लोकार्पण सोहळ्यावरून शिवसेना आणि राष्ट्रवादीत सुरू झालेले शाब्दिक युद्ध अजूनही सुरूच आहे. ठाण्याचे महापौर नरेश म्हस्के (thane mayor naresh mhaske ) आणि गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्यात कलगीतुरा रंगला आहे. म्हस्केंच्या फेसबुक पोस्टनंतर आव्हाडांनी नारायण राणेंकडे कोण जाणार होतं? असं म्हणत म्हस्केंच्या जखमेवर बोट ठेवलं. ठाण्यात शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांमधला वाद आज निवळला होता. पण महापौर नरेश म्हसके यांनी फेसबुक पोस्ट टाकून जितेंद्र आव्हाड यांना डिवचले. मग जितेंद्र आव्हाड यांनी जुने प्रकरण काढून चांगलेच सुनावले. ‘जे एक निष्ठेची भाषा करतात त्यांनी क्षणभर विश्रांती कुठे घेतली होती. जे एकनिष्ठे बद्दल बोलतात त्यांनी स्वतःच्या हृदयात जाऊन तपासावे, नारायण राणेंकडे कोण जाणार होते? कोणाला कोणाच्या गाडीतून उतरवण्यात आले, क्षणभर विश्रांती हॉटेलमध्ये कोणाला थांबवण्यात आले, या सर्व घटनांचा मी स्वतः साक्षीदार आहे. त्यामुळे निष्ठेची भाषा आम्हाला शिकवू नका’ असे खडेबोल जितेंद्र आव्हाड यांनी महापौर नरेश म्हस्के यांना सुनावले. दरम्यान, ठाणे महापालिकेसमोर आज सकाळ पासून एम एम आरडीए च्या घोटाळ्या च्या घोटाळ्याच्या विरोधात राष्ट्रवादी पक्षाकडून आंदोलन करण्यात आले याच आंदोलनाला मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी देखील आपली उपस्थिती दाखवली. आज सकाळपासून सुरू असलेले आंदोलन हे प्रशासन विरुद्ध असून आयुक्तांनी याची दखल घेतली पाहिजे होती. ठाणे महापालकिकेचे आयुक्त विपीन शर्मा हे दरवाजा बाहेर येताना सुद्धा विचारून येतात येऊ का? आयुक्तांना वाटत असेल की एक पक्षाची बाजू घेऊन महापालिका चालवू शकतात तर मला स्वतः उतरून काय ते दाखवायला लागेल. आताचे आयुक्त हे मुसलमान आणि दलितांच्या विरुद्ध आहेत, असा आरोपच आव्हाडांनी आयुक्तांवर केला. ‘आज जे प्रशासनाने केले ती मगरुरी राष्ट्रवादी काँगेस पार्टी सहन करणार नाही. येत्या काही दिवसात आम्ही याचे उत्तर देऊ सध्या हे आंदोलन इथेच थांबवायला सांगतो पंरतु येत्या दिवसात खूप काही बाहेर येणार आहे’, असा इशारा आव्हाड यांनी दिला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.

)







