अहमदनगर, 16 मार्च: पोलीस अधीक्षक (Superintendent Of Police) मनोज पाटील (Manoj Patil Vehicle Accident) यांच्या गाडीला एका ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरने जोरदार धडक (Sugarcane loaded tractor hit) दिल्याची माहिती समोर आली आहे. हा अपघात नगर- औरंगाबाद महामार्गावरील पोलीस अधिक्षक कार्यालयासमोर झाला. पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांची गाडी अधीक्षक कार्यालयाच्या गेटमधून आतमध्ये जात असताना या ट्रॅक्टरने जोरदार धडक दिली आहे. हा ट्रक्टर कुकडी कारखान्यासाठी ऊस वाहतूक करत असल्याची माहिती मिळाली आहे.
ट्रॅक्टरवरील चालकाचं नियंत्रण सुटल्याने झाला अपघात
ट्रॅक्टर चालकाचं नियंत्रण सुटल्यानं हा अपघात झाल्याचं म्हटलं जात आहे. यावेळी सुदैवाने पोलीस अधीक्षक मनोज पाटील गाडीत नसल्यानं मोठा अनर्थ टाळला आहे. पण अपघातात मनोज पाटील यांच्या गाडीचं बरंच नुकसान झालं आहे. अपघातग्रस्त ट्रॅक्टरला दोन ऊस वाहतूक करणारे टेलर लोड असल्यामुळे चालकाला गतीचा अंदाज आला नाही, त्यामुळे हा अपघात झाला आहे. या अपघातात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. मनोज पाटील यांच्या ड्रायव्हरसह ट्रॅक्टरचालकही सुखरूप आहे.
हे ही वाचा -मुंबई हादरली! मैत्री तोडली म्हणून तरुणाने युवतीसह तिच्या आईवर चाकूने केले वार
रस्त्यावर वाहतुकीचा खोळंबा
हा अपघात नेमका वळणावर झाल्याने काही काळ रत्यावरील वाहतूक ठप्प झाली होती. तसेच अपघात पाहण्यासाठी बघ्यांनी गर्दी केली होती. याप्रकरणी पोलिसांनी आवश्यक ती कार्यवाही करून ट्रॅक्टर चालकाला जाऊ दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Accident, Ahmednagar