कर्जत 12 ऑक्टोबर: कोरोनाच्या संकट काळात राष्ट्रवादीचे आमदार रोहित पवार हे त्यांच्या मतदारसंघात सक्रिय आहेत. सध्या स्वच्छ सर्वेक्षण स्पर्धा सुरू असल्याने त्यांनी आपला मतदारसंघ असलेल्या कर्जत जामखेडमध्ये मोठ्या अभियानाला सुरूवात केली आहे. सार्वजनिक स्वच्छता ही सामाजिक आणि वयक्तिक आरोग्यसाठी सर्वात महत्त्वाची गरज आहे. सध्या कोरोनाचं संकट असल्याचं या स्वच्छतेचं महत्त्व कधी नव्हे तेवढं वाढलेलं आहे. या स्वच्छता अभियानात रोहित पवार यांच्या आई सुनंदा पवार या सहभागी झाल्या आहेत. त्यामुळेच भारावलेल्या रोहित पवारांनी ‘थोर तुझे उपकार आई’ असं म्हटलं आहे.
सुनंदा पवार या बारामती ऍग्रीकल्चरल डेव्हलपमेंट ट्रस्टच्या विश्वस्त आहेत. त्यांचा विविध सामाजिक उक्रमात सक्रिय सहभाग असतो. त्यामुळेच कर्जत-जामखेडमध्ये सुरू असलेल्या स्वच्छता अभियानात त्या प्रत्यक्ष सहभागी झाल्यात. कार्यकर्त्यांना नुसते आदेश न देता त्यांनी स्वत: हातात खोरे-टिकाव घेवून अधिकाऱ्यांसोबत श्रमदान केलं आहे. शहरातील नागरिकांच्या वॉर्ड निहाय बैठका घेवून संवाद साधत त्यांनी स्वच्छते संबंधात जन-जागृतीही केली आहे.
सुनंदाताईंचे फोटो सोशल मीडियावरही व्हायरल झाले आहेत. आईंचं हे काम पाहून रोहित पवार हे भारावू गेले आहेत. त्यामुळेच आपल्या भावना व्यक्त करताना त्यांनी ‘थोर तुझे उपकार आई…’ असं म्हटलं आहे.
शरद पवार समजायला सात जन्म लागतील, राष्ट्रवादीच्या नेत्याचा भाजपवर पलटवार
विधानसभा निवडणुकीत भाजपचे दिग्गज नेते राम शिंदे यांचा पराभव करून रोहित पवार हे पहिल्यांदाच निवडून आले आहेत. 1995 पासून कर्जत-जामखेड या मतदारसंघात भाजपचा उमेदवार निवडून येत होता. ती परंपरा खंडीत करून रोहित पवार यांनी सक्रिय राजकारणात प्रवेश केला होता.
रोहित यांच्यावर शरद पवारांची छाप असल्याचं बोललं जातं. शरद पवारही रोहित यांना खास आपल्या मर्जीत तयार करत आहेत. पहिलीच वेळ असल्याने रोहित पवार हे आपल्या मतदार संघात लक्ष घालत असून कार्यकर्त्यांचं जाळ निर्माण करत पक्ष बांधणी मजबूत करण्यावर त्यांनी भर दिलेली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.