Home /News /maharashtra /

'जाणता राजा' वादावर शरद पवारांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा

'जाणता राजा' वादावर शरद पवारांनी सोडलं मौन, केला मोठा खुलासा

'शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते तर राजामाता जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल.'

  किरण मोहिते, सातारा 15 जानेवारी : आज के शिवाजी, नरेंद्र मोदी या पुस्तकावरून महाराष्ट्रात वाद निर्माण झाला होता. भाजपच्या एका नेत्याने या पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराज आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची तुलना केली होती. त्यानंतर या वादाला सुरुवात झाली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीने यावरून भाजप आणि नरेंद्र मोदी यांच्यावर टीकेची झोड उठवली होती. तर भाजपने पलटवार करत शरद पवारांना महाराष्ट्राचा जाणता राजा असं म्हणणं चालतं का? असा सवाल केला होता. गेले काही दिवस यावर वाद पेटला होता. आता या वादावर शरद पवारांनी मौन सोडलंय. सातारा इथं झालेल्या जाहीर सभेत त्यांनी त्यावर आपली भूमिका मांडली. पवार म्हणाले, इथे आल्यापासून सगळे माझ्या मागे लागले आहेत. मी तरी कोणाला कांही बोललो नाही. मला जाणता राजा म्हणा असं मी कुठेच कुणाला म्हणालो नाही. जाणता राजा हा शब्द रामदास यांनी आणला. शिवचरित्राचा व्यवस्थित अभ्यास केल्यास जाणता राजा ही उपाधी शिवाजी महाराजांना कधीच लावण्यात आली नव्हती. शिवाजी महाराज यांचे गुरु रामदास नव्हते तर राजामाता जिजाऊ या गुरू होत्या. शिवाजी महाराजांचे गुरु रामदास होते ही लेखणीची कमाल. लेखणीची छत्रपती ही शिवाजी महाराजांची खरी उपाधी आहे. बासाहेबांच्या पुतळ्याची उंची 100 फुटांनी वाढणार, मंत्रिमंडळाचे 10 मोठे निर्णय उदयनराजे भोसले यांनी निशाणा साधला... भाजप नेते आणि माजी खासदार उदयनराजे भोसले यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर टीका केली होती.'अनेकजण स्वत:ला जाणता राजा म्हणवून घेतात. पण जाणता राजा या जगात फक्त एकच आहे, ते म्हणजे शिवाजी महाराज. त्यामुळे कोणालाही जे जाणता राजा म्हणतात, त्याचाही मी निषेध करतो,' असे म्हणत उदयनराजे भोसले यांनी पवारांवर निशाणा साधला होता. शिवाजी महाराज यांची तुलना पंतप्रधान मोदींशी केली. मात्र जगात शिवाजी महाराज यांची उंची गाठता येईल, असे कुणी नाही, असेही उदयनराजे म्हणाले होते. उदयनराजे म्हणाले, कुणालाही 'जाणता राजा'ची उपमा देणं याचा निषेध करतो. जाणता राजा फक्त आणि फक्त शिवाजी महाराज आहे. शिवाजी महाराज म्हणजे युगपुरुष होते, असे सांगत लोकांनी बुद्धी गहाण ठेवली आहे का? असा सवालही उदयनराजे भोसले यांनी उपस्थित केला होता.

  अभिनेत्रीची विमानात छेड काढणं पडलं महागात, कोर्टाने सुनावली 3 वर्षांची शिक्षा

  उदयनराजेंची शिवसेनेवर टीका पुस्तकातल्या मजकुराबद्दल वाईट वाटलं, महाशिवआघाडीतून शिव का काढून टाकलं? शिवसेना जेव्हा काढली तेव्हा वंशजांना विचारायला आली होती का? अशा शब्दात उदयनराजेंनी शिवसेनेवर निशाणा साधला. शिवसेनेला नाव दिलं तेव्हा वंशजांना विचारायला आला होता का? शिवाजी महाराज कुणी होऊ शकत नाही. महाराजांचे वंशज म्हणून कधी नावाचा दुरुपयोग केला नाही. आम्ही त्या घराण्यात जन्माला आलो याचा सार्थ अभिमान असल्याचेही उदयनराजे यांनी सांगितले आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Sharad pawar

  पुढील बातम्या