विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी पंढरपूर, 08 डिसेंबर : माढा तालुक्यातील भोगेवाडीच्या सुनील आणि संतोषी काळे या शेतकरी दांम्पत्याची कन्या पल्लवी ही नौदल परीक्षेत देशात दुसरी आली आहे. भोगेवाडीसारख्या खेड्यातील शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या पल्लवीची भारतीय नौदल कोस्ट गार्ड असिस्टंट कमांडन्ट पदासाठी निवड झाली. या देशाच्या पोशिंद्याची लेक ऐवढ्या मोठ्या पदावर गेल्यानं सगळ्या गावात आनंदाचं वातावरण आहे. तर सर्वच स्तरातून पल्लवीचं कौतूक होतं आहे. भोगेवाडी गावात भारतीय सैन्य दलात अनेक तरुण सीमेवर मातृभूमीचे रक्षण करत आहेत. त्यातच आता पल्लवीच्या रूपाने गावाला नौदलातील पहिली महिला अधिकारी मिळणार आहे. केंद्रीय स्टाफ सिलेक्शनच्या घेण्यात आलेल्या परीक्षेत तिने दुसरा क्रमांक पटकावला आहे. पल्लवीच्या या कामगिरीचं करावं तितकं कौतूक कमी आहे. गावातील आणि देशातील इतर महिलांनी आणि मुलीने तिच्या कामगिरीचा आदर्श घेतला पाहिजे. आपल्या परिस्थितीवर मात करत आई-वडिल्यांच्या डोळ्यांतलं पाणी पुसतं पल्लवीनं हे यश मिळवलं आहे. इतर बातम्या - ‘पंढरीचा विठ्ठल कुणी पाहिला…’ फुलांची सजावट पाहून तुमचंही मन होईल प्रसन्न पल्लवीचं पहिली ते चौथीपर्यंतचं शिक्षण भोगेवाडी जि.प.प्राथमिक शाळेत झालं आहे. पाचवी ते बारावीचं शिक्षण राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा तर मेकॅनिकल इंजिनियरिंगची पदवी सिंहगड इन्स्टिट्युट येथे पूर्ण केली आहे. ती पुण्यात स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करत होती. या यशानंतर बोलताना, प्रत्यकाने आई वडिलांच्या कष्टांची जाण बाळगून स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणे आवश्यक असल्याचे तिने सांगितले. ध्येय सत्यात उतरवण्यासाठी अभ्यासात सातत्य, सकारात्मक विचार आवश्यक असल्याचे पल्लवीने म्हटले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.