Home /News /maharashtra /

यांना जरा समजवा...कोरोना टेस्ट केंद्र उभारण्यास विरोध, सोलापुरात नागरीक आक्रमक

यांना जरा समजवा...कोरोना टेस्ट केंद्र उभारण्यास विरोध, सोलापुरात नागरीक आक्रमक

प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शेकडो महिला आणि पुरुषांनी वाडिया रुग्णालयाबाहेर ठाण मांडलीय.

  सोलापूर 12 मार्च : जगभर कोरोनाने आता चांगलेच हातपाय पसरले आहेत. भारतातही दररोज कोरोनाच्या रुग्णांची संख्या वाढते आहे. महाराष्ट्रातही काही शहरांमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळल्याने चिंतेचे वातावरण पसरलंय. कोरोनाची स्टेस्ट करण्यासाठी सध्या वेगळ्या लॅबॉरटेरीजची गरज आहे. मोजक्याच असलेल्या अशा लॅब्जवर ताण पडत आहे. त्यामुळो सोलापूर जिल्हा प्रशासनाने अशा प्रकारसो सोय असणारं केंद्र शहरात उभारण्याचा निर्णय घेतला होता. मात्र नागरीकांनी त्याला विरोध केलाय. कवेळ गैरसमजातून हा विरोध होत असून नागरीकांना आता कोण समजविणार असा प्रश्न आता विचारला जातोय. सोलापुरात कोरोनाच्या तपासणी आणि निदान केंद्राला स्थानिक नागरिकांचा विरोध होताना पाहायला मिळतोय. जिल्हा प्रशासनाने कोरोनाचे उपचार केंद्र शहरातील कुमार चौकातील बंद स्थितीत असलेल्या वाडिया रुग्णालयात नियोजित केल्याची चर्चा परिसरात पसरली. त्यामुळे वाडिया हॉस्पिटल परिसरात राहणारे शेकडो नागरिक चांगलेच आक्रमक झालेत. कोरोना रुग्ण उपचार केंद्र हे शहराच्या मध्यवर्ती भागात न  करता शहराबाहेर करावे अन्यथा आमच्या रोषाला सामोरे जावे लागण्याचा इशाराही स्थानिकांनी दिलाय. प्रशासनाच्या या निर्णयाविरोधात शेकडो महिला आणि पुरुषांनी वाडिया रुग्णालयाबाहेर ठाण मांडलीय. त्यामुळे एकीकडे कोरोनाचे आव्हान असतानाच आता जिल्हा प्रशासनापुढे नागरिकांचा रोष कमी करण्याचेही मोठे आव्हान उभे ठाकलेय. त्यामुळे जिल्हा प्रशासन याबाबत नक्की काय निर्णय घेणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागलंय.

  मास्क धुवून होते विकणार, पण कामगाराने फेकून दिले कचऱ्यात; पोलिसांनी केली अटक

  भारतातही कोरोना व्हायरसमुळे पहिला बळी केरळमध्ये गेला आहे. त्यामुळे आता केंद्र सरकारने कडक पाऊल उचलण्यात सुरुवात केली आहे. भारतात येणाऱ्या परदेशी पर्यटकाने व्हिसा 15 एप्रिलपर्यंत रद्द करण्यात आले आहे. 13 मार्च मध्यरात्रीपासून या निर्णयाची अंमलबजावणी होणार आहे. केंद्र सरकारने  कोरोना व्हायरसपासून खबरदारी घेण्यासाठी परदेशी पर्यटकांना भारतात येण्यास तुर्तास मनाई केली आहे.  पुढील महिन्यात 15 एप्रिल पर्यंत भारताचा व्हिसा देण्यास नकार दिला आहे. यामध्ये डिप्लोमेटिक, कार्यालयीन व्हिसा, यूएन आणि आंतरराष्ट्रीय संघटना आणि प्रोजेक्ट व्हिसा सोडून सर्व प्रकारच्या व्हिसा रद्द करण्यात आले आहे. या निर्णयाची अंमलबाजवणी 13 मार्चच्या मध्यरात्रीपासून लागू होणार आहे.

  नागपूरमध्येही कोरोना व्हायरसची धडक, पहिला पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

  15 फेब्रुवरी 2020 नंतर चीन, इटली, इराण, कोरिया गणराज्य, फ्रान्स, स्पेन आणि जर्मनीमध्ये गेलेल्या भारतीयांसह येणाऱ्या सर्व पर्यटकांना 14 दिवस वैद्यकीय तपासणीच्या देखरेखी खाली ठेवण्यात आलं आहे.
  Published by:Ajay Kautikwar
  First published:

  Tags: Corona virus

  पुढील बातम्या